संक्षिप्त प्रादेशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:21+5:302021-03-17T04:14:21+5:30
बेलोरा (अमरावती) : चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरजगाव बंड येथे श्यामराव संपतराव गायधने (७५) यांनी सोमवारी रात्री उशिरा ...

संक्षिप्त प्रादेशिक
बेलोरा (अमरावती) : चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरजगाव बंड येथे श्यामराव संपतराव गायधने (७५) यांनी सोमवारी रात्री उशिरा गुरांच्या गोठ्यात गळफास घेतला. सकाळी पत्नी गोठ्यात गेल्यानंतर त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. याप्रकरणी ठाणेदार सुनील किनगे यांनी मर्ग दाखल केला आहे.
------------
चांदूर बाजार येथे युवकाने घेतले विष
बेलोरा (अमरावती) : चांदूर बाजार शहरातील रहिवासी मंगेश बाबाराव इंगळे (२८) या युवकाने १३ मार्च रोजी विष घेतले होते. त्याचा अमरावती येथील रुग्णालयात सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी मर्ग दाखल केला. हेडकॉन्स्टेबल दिलीप नांदूरकर, शुभांगी काळे पुढील तपास करीत आहेत.
----------
लग्नात वाजंत्रीला परवानगी
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी कोरोनासंबंधी बजावलेल्या नव्या आदेशानुसार, लग्न समारंभासाठी आता २५ व्यक्तींना उपस्थित राहता येईल तसेच वाजंत्रीलाही परवानगी देण्यात आली. बँड पथकांना फक्त विवाहस्थळीच वाद्य वाजविण्याची परवानगी आहे. हे पथक पाच जणांचे असावे व प्रत्येकाची चाचणी झालेली असणे बंधनकारक आहे.