संक्षिप्त प्रादेशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST2021-03-10T04:15:17+5:302021-03-10T04:15:17+5:30

अमरावती : पोलीस ठाण्यात तक्रार देऊन घरी परत जात असलेल्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना ७ मार्च ...

Abbreviated Territorial | संक्षिप्त प्रादेशिक

संक्षिप्त प्रादेशिक

अमरावती : पोलीस ठाण्यात तक्रार देऊन घरी परत जात असलेल्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना ७ मार्च रोजी जुने बायपासलगतच्या ऑक्सीजन पार्कजवळ घडली. महिलेच्या तक्रारीवरून प्रफुल्ल गजभिये, विशाल यांच्याविरूद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ (अ), ५०४ अन्वये फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

------------------

शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

अमरावती : दोन महिलांनी घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ८ मार्च रोजी वडरपुरा येथे घडली. फिर्यादी महिलेच्या तक्ररीवरून परिसरतीलच दोन आरोपी महिलांविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ५०६ (ब), ३२३ अन्वये फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

-------------------

नालीच्या सांडपाण्यावरून शिवीगाळ

अमरावती : नालीचे पाणी घरात शिरत असल्याच्या कारणावरून दोन महिलांनी अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ८ मार्च रोजी घडली. महिलेच्या फिर्यादीवरून दोन महिलांविरुद्ध भादंविच्या भादंविच्या कलम २९४, ५०६ (ब) ३२३ अन्वये फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजमल्लू तपास करीत आहेत.

Web Title: Abbreviated Territorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.