संक्षिप्त प्रादेशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:31+5:302021-02-27T04:15:31+5:30
अमरावती: येथील बिच्छुटेकडी भागात वीटभट्ट्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. यात काही अतिक्रमण हे वन, महसूल विभागाच्या जागेवर ...

संक्षिप्त प्रादेशिक
अमरावती: येथील बिच्छुटेकडी भागात वीटभट्ट्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. यात काही अतिक्रमण हे वन, महसूल विभागाच्या जागेवर आहे. न्यायालयीन प्रकरणांच्या नावे वर्षांनुवर्षे वीटभट्ट्यांचे अतिक्रमण कायम आहे.
----------------------
नवीन बायपास-वडाळी वळण मार्ग उखडला
अमरावती : नागपूर महामार्ग नवीन बायपास ते वडाळीकडे जाणारा वळण मार्ग उखडला आहे. या मार्गावरून नियमित वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, दुरुस्ती करण्यात आलेली नाही. दुचाकी, चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहत असून, हा मार्ग दुरुस्त करावा, अशी मागणी आहे.
-----------------------------
कोंडेश्वर मार्गावर ई-क्लास जमिनींवर खोदकाम
अमरावती : बडनेरा ते कोंडेश्वर मार्गावर ई-क्लास जमिनीवर जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामांमुळे मोठे खड्डे पडले असून, ते जीवघेणी ठरत आहे. अवैधरीत्या खोदकाम करून खनिज संपत्ती चोरी होत असताना, तलाठीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
--------------------------------