आम आदमी पार्टीच्या विजयाचा शहरात जल्लोष
By Admin | Updated: February 11, 2015 00:22 IST2015-02-11T00:22:38+5:302015-02-11T00:22:38+5:30
दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप व काँग्रेसला धूळ चारत अभूतपूर्व विजय मिळविल्याने या विजयाचा जल्लोष अंबानगरीतही ...

आम आदमी पार्टीच्या विजयाचा शहरात जल्लोष
अमरावती : दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप व काँग्रेसला धूळ चारत अभूतपूर्व विजय मिळविल्याने या विजयाचा जल्लोष अंबानगरीतही कार्यकर्त्यांनी पार्टीच्या शंकरनगर कार्यालयात धडाक्यात साजरा केला.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांनी प्रचारादरम्यान रान उठविले होते. मतदारांनी भाजपा प्रचाराला झुगारुन आम आदमी पार्टीला पुन्हा एकदा दिल्लीचे सिंहासन मिळवून दिले. विधानसभेच्या ७० जागांपैकी तब्बल ६७ जागांवर आम आदमी पार्टीने यश मिळविले आहे. भाजपाला तीन जागांवरच समाधान मानून न भुतो न भविष्य पराभव बघावा लागला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. यामध्ये दुसऱ्यांदा दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला मताचा कौल दिल्याने अंबानगरीतील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने ढोल ताशाच्या गजरात आणि डिजेच्या तालावर ताल धरत पार्टी कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला.