मतदार ओळखपत्रालाही आधार क्रमांकाची लिंक
By Admin | Updated: March 13, 2015 00:25 IST2015-03-13T00:25:16+5:302015-03-13T00:25:16+5:30
मतदार यादीतील त्रुटी दुकान करण्यासाठी ३ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे.

मतदार ओळखपत्रालाही आधार क्रमांकाची लिंक
अमरावती : मतदार यादीतील त्रुटी दुकान करण्यासाठी ३ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. यात मतदान ओळखपत्राला आधारकार्ड क्रमांक जोडण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे. त्यांनी आॅनलाईन अथवा तहसीलमध्ये जावून आधारकार्ड लिकींग करावे लागणार आहे.
या मोहीमेची माहिती देण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांनी सर्व मतदार संघामध्ये पुढील महिन्यात विशेष शिबीर घेणार आहेत ही मोहीम प्रत्येक महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहे. ही सुविधा जवळच्या ई महासेवा केंद्र, मतदार मदत केंद्र, नागरी सेवा केंद्रात सुरु केली जाणार आहे. यादीतील दूबार नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ सादर करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव, वय पत्ता, फोटो यामध्ये चूका असतील त्यांनी फॉर्म क्र.८ संबंधीत तहसीलदारांकडे भरुन द्यावा त्याच बरोबर नाव वगळणे व दूरुस्तीसाठी आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा राहणार आहे.