शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अवैध होर्डिंग काढण्यासाठी घ्या आठवडाभराचा 'स्पेशल ड्राइव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 11:02 IST

महापालिका, नगरपरिषदांना आदेश : मुंबई उच्च न्यायालयाची तंबी अवैध

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्यभरातील नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत महाकाय अवैध होर्डिंगधारकांनी बजबजपुरी माजवली आहे. आगामी विधानसभा निवडणुका, तसेच राजकीय घडामोडी पाहता राज्यात अधिकाधिक बेकायदा होर्डिंग्ज लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सात ते दहा दिवसांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व ग्रामपंचायतींना दिले आहेत.

राज्यातील विविध शहरांत राजकीय पक्षांकडून बेकायदा होर्डिंग्ज लावली जातात. याप्रकरणी सुस्वराज्य फाउंडेशन व इतर काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. याप्रकरणी न्यायालयानेही सुमोटो याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. 

यावेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर होर्डिंग्जचे प्रमाण वाढणार असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी केला. म्हणूनच रस्ते, उद्यान व इतर सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग्ज हटविण्यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत, तसेच शहर विद्रूप केल्यास राजकीय पक्षांनाही सोडणार नाही, अशी तंबीही दिली आहे. न्यायालयाने सात ते दहा दिवसांसाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश राज्यातील सर्व पालिका, नगर परिषद व ग्रामपंचायतींना दिले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी उचलावीत कारवाईची पावले राजकीय व सामाजिक संस्था, संघटनांच्या बेकायदा होर्डिंग्जची व्याप्ती विचारात घेत मूळ जनहित याचिकेवर नव्याने, तसेच सध्याच्या अवमान याचिकेवरही सुनावणी घेण्यास खंडपीठाने तयारी दर्शविली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व यंत्रणाप्रमुखांना सोबत घेऊन तीन दिवसांत बैठक घ्यावी. सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना सोबत घेऊन कारवाईची पावले उचलावीत, असे निर्देश देताना १८ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली.

अशी आहे अमरावतीतील स्थिती घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर १४ मे रोजी नगरविकास विभागाने अवैध होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे अमरावती मनपा हद्दीतील ४०५ अवैध होर्डिंग्जपैकी २२५ होर्डिंग्ज निघालेदेखील. मात्र, त्यानंतर काही एजन्सीनी अनधिकृत होर्डिंग नियमित करून घेण्यासाठी महापालिकेत धाव घेतली. होर्डिंग नियमितीकरणासाठी आलेल्या १८० प्रस्तावांची झोन उपअभियंत्यांकडून तपासणी झाल्याचे व पैकी काहींनी रक्कम भरल्याची माहिती बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हान यांनी 'लोकमत'ला दिली.

टॅग्स :Amravatiअमरावती