शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाहित्य चोरणारी चोरजोडी पोलिसांकडून ट्रॅप; दुचाकी, मोटर पंप जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: November 27, 2023 18:23 IST

नांदगाव खंडेश्वर पोलिसांची कारवाई

अमरावती : शेती साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली. रामेश्वर लक्ष्मणराव खंडाते व विकास हरिदास मारब्दे (दोघेही रा. येरड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून शेतातील मोटर पंप जप्त करण्यात आला.

नांदगांव खंडेश्वर पोलीस पथक पेट्रोलिंग करित असतांना दोन इसम हे एका दुचाकीवर चांदुर रेल्वे-नांदगांव खंडेश्वर रोडने फिरत असून त्यांच्या जवळ शेतातील मोटरपंप आहे. ते विक्रीच्या उद्देशाने चौकशी करित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नाकाबंदी करून त्या दुचाकीस थांबविले असता दुचाकीवरील रामेश्वर खंडाते व विकास मारब्दे यांच्याकडे मोटर पंप मिळून आला. तो मोटर पंप आपण ऑक्टोबर महिन्यात नांदगाव येथील किशोर जैन यांच्या शेतातून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. ते त्या मोटरपंपची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून चोरीचे मोटारपंप व गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

आणखी काही घटनांचा उलगडा

अटक आरोपींकडून शेती साहित्य चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून पुढील तपास नांदगांव खंडेश्वर पोलीस करित आहेत. पोलीस अधिक्षक विशाल आंनद, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उप-विभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनात नांदगावचे ठाणेदार विशाल पोळकर, पोलीस अंमलदार राजेश हिरेकर, सतिश राठोड, निखिल मेटे, प्रशांत पोकळे, राहुल गजभिये यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकAmravatiअमरावती