शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

घरफोडी, मंदिर चोरीतील आंतरराज्यीय गुन्हेगारांची जोडी जेरबंद; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: July 20, 2023 18:58 IST

सलीम ऊर्फ गोकुल राजु उईके (५१) व सलीम ऊर्फ सल्लू भुरे खान नुर खान पठाण (४७, दोघेही रा. बैतुल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील मंदिरातील चोरी व धनेगाव येथील घरफोडीतील आंतरराज्यीय गुन्हेगार जोडीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांनी १९ जुलै रोजी ही यशस्वी कारवाई केली. सलीम ऊर्फ गोकुल राजु उईके (५१) व सलीम ऊर्फ सल्लू भुरे खान नुर खान पठाण (४७, दोघेही रा. बैतुल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

१८ जुलै रोजी रात्रीदरम्यान सावकारपुरा, अजंनगांव येथील जैन मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी मंदिरातील दानपेटीमधील ६ हजार रुपये रोख, पारसनाथ स्वामीच्या मुर्तीवरील चांदीचे छत्र चोरून नेले. तर त्याच रात्री धनेगांव येथील सुनिल येवले यांच्या घरातून १ लाख २६ हजार ८०० रुपये रोख व सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकुण १ लाख ६१ हजारांचा माल चोरून नेला होता. अंजनगाव पोलिसांनी दोन्ही घटनेप्रकरणी गुन्हे नोंदविले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्या घटनांचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव पोलिसांचे संयुक्त पथक गठित केले होते.

१.२३ लाखांचा मुद्देमाल जप्तत्या पथकाने दोन्ही गुन्हयांची कार्यपध्दती, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास आरंभला. घटनेच्या दिवशी बैतूल येथील सल्लु भुरे खान व गोकुल उईके हे अंजनगावत फिरत होते, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे पथकाने त्वरेने बैतूल गाठत त्या दोघांना शिताफीने अटक केली. त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून ४३ हजार ५७० रुपये रोख, गुन्हयात वापरलेली दुचाकी, लोखंडी टॉमी असा एकूण १ लाख २३ हजार ६७०/- रूपयांचा माल जप्त करण्यात आला. यातील सलीम ऊर्फ सल्लु भुरे खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द अमरावती शहर व ग्रामीणमध्ये गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाईपोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात अंजनगावचे ठाणेदार दिपक वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संजय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, विजय शेवतकर, सैय्यद अजमत, निलेश डांगोरे, सचिन मिश्रा, जयसिंग चव्हाण, विशाल थोरात, शुभम मार्कंड यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीPoliceपोलिस