शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

लोकांनी धास्ती घेतलेला बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार, आता हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 22:54 IST

‘लोकमत’ १६ ऑक्टोबर रोजी ‘शहराच्या सीमावर्ती नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा धोका’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. मात्र, पहाटे सोडतीन वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने अंदाजे चार ते पाच वर्षे वय असलेला नर बिबट्या जागीच ठार झाला. आता मात्र बिबट्या गेल्यामुळे वन्यजीवप्रेमी, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील रहाटगाव-बडनेरा नवीन बायपासवर हॉटेल गौरी इनपासून ५०० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा रविवारी, पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा, तसेच शवविच्छेदन करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. ‘लोकमत’ १६ ऑक्टोबर रोजी ‘शहराच्या सीमावर्ती नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा धोका’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. मात्र, पहाटे सोडतीन वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने अंदाजे चार ते पाच वर्षे वय असलेला नर बिबट्या जागीच ठार झाला. आता मात्र बिबट्या गेल्यामुळे वन्यजीवप्रेमी, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागाचे साहाय्यक आयुक्त आर. डब्ल्यू. खेरडे यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड व डॉ. एस. आर. ठोसर यांनी शवविच्छेदन केले.काही दिवसांपासून अमरावती शहराच्या सीमावर्ती भागात शिकारीच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीकडे धाव घेत आहे. त्याच अनुषंगाने रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अर्जुननगरच्या मागील बाजूकडील भागातून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना बिबट्याला अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राण गमवावे लागले. सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, आरएफओ वर्षा हरणे, क्षेत्र सहायक एस.एम. देशमुख, वनरक्षक एस.डी. टिकले, पी.एस. खाडे, के. एन. इंगळे, ओंकार भुरे, राजू पिंजरकर, सी.बी. चोले, संदीप चौधरी, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर आदी उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर मृत बिबट्यास अग्नी देण्यात आला. वनसंरक्षक जी. के. अनारसे, उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली. 

शिकारीसाठी नागरी वस्तीत धावकाही दिवसांपासून बिबट श्वान, वराहाच्या  शिकारीसाठी महादेव खोरी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था कठोरा मार्ग, विद्यापीठ परिसर नवसारी आदी भागात वारंवार आढळून आल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींनी संयुक्त गस्तदेखील सतत चालविली.  मात्र, रविवारी पहाटे झालेल्या अपघातात बिबट्या ठार झाला.

 

टॅग्स :leopardबिबट्या