बोरगाव पेठ येथून भरमार बंदूक जप्त
By प्रदीप भाकरे | Updated: February 11, 2024 18:09 IST2024-02-11T18:09:46+5:302024-02-11T18:09:54+5:30
त्याच्याविरुद्ध सरमसपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोरगाव पेठ येथून भरमार बंदूक जप्त
अमरावती: अवैधरित्या भरमार बंदूक बाळगणाऱ्या बोरगाव पेठ येथील रहिवासी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवार, १० फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली. सुरेश विष्णू नांदणे (३२, रा. बोरगाव पेठ, अचलपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सुरेश हा अवैधरित्या भरमार बंदूक बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. झडतीत त्याच्या घरी लाकडी बट व लोखंडी बॅरल असलेली भरमार बंदूक आढळून आली. त्यामुळे त्याला बंदूक बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार त्याला अटक करून बंदूक जप्त करण्यात आली.
त्याच्याविरुद्ध सरमसपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने यांनी केली.