शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चौघांच्या टोळक्याकडून दीड तासात वाटमारीचा चौकार; चार घटना ,पोलिसांकडून एकच एफआयआर 

By प्रदीप भाकरे | Updated: April 19, 2024 13:38 IST

चार मोबाईल, सोन्याची पोथ, रोख हिसकावली.

प्रदीप भाकरे, अमरावती: चार जणांच्या टोळक्याने अवघ्या दिड तासात चौघांना लुटले. यात चार मोबाईल, सोन्याची पोथ व रोख रक्कम हिसकावण्यात आली. १८ एप्रिल रोजी दुपारी १२ ते दिड या कालावधीत ती जबरी चोरीची मालिका घडली. वाटमारीच्या या चार घटनांप्रकरणी चार स्वतंत्र एफआयआरऐवजी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी एकच एफआयआर नोंदविला. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१२ च्या सुमारास याप्रकरणी, मंगेश किशोर वानखडे (३३, रा. कठोरा बू.) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार इसमांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी मंगश वानखडे १८ एप्रिल रोजी दुपारी १२ डवरगाव येथून डिजेचे काम आटपवून राजपुत धाबा ते जकात नाका चौक रोडवरील देशमुख फार्म हाऊस जवळ आले. त्यावेळी अज्ञात तीन इसम त्यांच्या वाहनासमोर आले. पेट्रोल है क्या, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर सामने चलो पेट्रोल देता हु, असे वानखडे यांनी म्हटले असता त्यातील एका इसमाने त्यांच्या गाडीची चाबी काढली. एकाने वानखडे यांचा गळा पकडून ‘तेरे पास जो है वह निकाल’, असे म्हणून त्यांच्या पँन्टच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल व नगदी तीन हजार रुपये जबरीने काढून घेतले. जाताना ते त्यांच्या दुचाकीची चाबी घेऊन गेले.

सलग चार घटना-

वानखडे यांच्यानुसार, नंतर त्याच तीन इसमांनी त्याच्या आणखी एका साथीदारासह वलगाव रोडस्थित रजनी मंगल कार्यालय येथे एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील १० हजार रुपयांचा मोबाईल व महिलेच्या गळ्यातील ८ हजारांची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ जबरीने हिसकून घेऊन गेले. तसेच गाडगेनगरस्थित ठाकरे मेडिकलसमोर रोशन काळे नामक मुलगा मित्रासोबत मोटार सायकलने जात असतांना त्याच आरोपींनी मागून येऊन त्याच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल पळविला. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी जिल्हा स्टेडियम समोरुन पायदळ जात असलेल्या शंतनू वानखडे याच्याकडील १२ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्या मार्गाावरील सीसीटिव्ही तपासल्या जात आहेत.

दिड तासाच्या कालावधीमधील त्या चारही घटना आहेत. चारही घटना सारख्या असल्याने एकच एफआयआर नोंदविण्यात आला. जकात नाका चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंतच्या त्या घटना आहेत. - हनुमंत गिरमे, ठाणेदार, गाडगेनगर

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस