शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंगाराच्या गोदामाला भीषण आग; चांदूर बाजारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 15:45 IST

३० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

ठळक मुद्देजीवितहानी नाही

चांदूर बाजार (अमरावती) : स्थानिक मुस्लिम कब्रस्तानच्या मागे असलेल्या एका भंगार गोदामाला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून ५० हजार रुपयांचे भंगार जळाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. स्थानिक अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे ही आग अवघ्या अर्धा तासात आटोक्यात येण्यास यश मिळाले.

परतवाडा मार्गावर असलेल्या मुस्लिम कब्रस्तानमागे खुल्या जागेत अमरावती येथील शेख नजीब शेख हबीब यांनी टिनाचे गोदाम बनविले होते. या गोदामात भंगार, प्लास्टिक, चपलांचा माल ठेवला होता. या गोदामला अचानक आग लागल्याने यातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणेदार सुनील किनगे यांना दिली. पोलीस ताफ्यासह नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पालिकेचे कर्मचारी संतोष डोळे, राजेश उसरबरसे, रमेश आमझरे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी परिसरातील नागरिकांनीसुद्धा आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, गोदामात ठेवलेले भंगार टायर, प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीमध्ये ५० हजार रुपयांचे भंगार साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती नगरपालिका व पोलीस विभागाने दिली आहे.

टॅग्स :Accidentअपघातfireआग