शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेमीयुगुल आढळले मृतावस्थेत, शरीरावर चाकूच्या जखमा; शहरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 18:23 IST

बुधवारी सकाळी एका शेतातील खोलीत दोघांचे मृतदेह एकमेकाला आलिंगन घातलेल्या अवस्थेत दिसून आले. मृतदेहाजवळ चायना चाकू आढळून आला. त्यामुळे चाकूने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

ठळक मुद्देपरतवाड्यातील घटनाघटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल

नरेंद्र जावरे 

परतवाडा (अमरावती) : विवाहित प्रेमीयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी १० वाजता अकोला मार्गावरील येणी पांढरी येथील एका शेतशिवारात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

सुधीर रामदास बोबडे (वय ५२), वनश्री कॉलनी कांडली व अलका मनोज दोडके (वय ४८) रामनगर कांडली अशी चाकूने वार करीत आत्महत्या करणाऱ्या विवाहित प्रेमी युगुलांची नावे आहेत. दोघेही मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील खोलीत दोघांचे मृतदेह एकमेकाला आलिंगन घातलेल्या अवस्थेत दिसून आले. मृतदेहाजवळ चायना चाकू आढळून आला. त्यामुळे चाकूने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी गोवर हसन परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले व कर्मचारी पंचनामा व इतर माहिती घेत आहेत.

महिला बेपत्ता झाल्याची तक्रार

मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत अलका दोडके या घरी न आल्यामुळे यांचा शोध घेण्यात आला. मोबाईलवरसुद्धा अनेकदा संपर्क केला. परंतु, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याची माहिती असून त्यांच्या परिवारांनी परतवाडा पोलिसांना  माहिती दिली होती. शोध मोहीम सुरू असताना बुधवारी सकाळी मृतावस्थेत आढळल्याचे उघड झाले.गळा आणि पोटातही वार

राकेश अग्रवाल यांच्या शेतातील शेत सामान ठेवण्याच्या खोलीत दोघांचे मृतदेह रक्ताने नितचिप असलेल्या अवस्थेत आढळून आले. गळा चिरण्यासह पोटातही चाकूने वार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.फॉरेन्सिक टीम घटनास्थळी

घटना माहित घडतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, दोघांचे मृतदेह पाहता चाकून कुणी-कुणावर वार केला याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

दोघेही विवाहित

सुधीर बोबडे याचा कांडली कविठा मार्गावर पान टपरी चा व्यवसाय आहे तर अलका दोडके या गृहिणी होत्या. दोघांचे वेगळे संसार असून मुलं-बाळं आहेत.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत पंचनामा सुरू आहे फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर पंचनामा इतर माहिती घेतल्या जाईल गळ्यावर पोटात चाकू वार केल्याचे प्रथम दृष्ट्या दिसत आहे. - संतोष ताले ठाणेदार परतवाडा

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती