प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अल्पवयीन मुलीला गरोदर केले!
By प्रदीप भाकरे | Updated: January 10, 2024 15:05 IST2024-01-10T15:05:24+5:302024-01-10T15:05:41+5:30
पीडितेच्या जबाबावरून आरोपी नरेश बारसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अल्पवयीन मुलीला गरोदर केले!
अमरावती : वारंवार केलेल्या अतिप्रसंगातून एका १७ वर्षीय मुलीला गर्भधारणा झाली. २५ ऑक्टोबर २०२३ पासून आरोपीने तिचा लैंगिक छळ केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी ९ जानेवारी रोजी आरोपी नरेश नानकराम बारसकर (३३, रा. जामुलनी, ता. भैसदेही, जि. बैतूल) याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपीने २५ ऑक्टोबरपासून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केल्याने ती गर्भवती राहिली. दरम्यान, तिची प्रकृती बरी नसल्याने तिला परतवाडा येथील एका रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून ती आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. ती माहिती परतवाडा पोलिसांसह बालकल्याण समितीला देण्यात आली. त्यांनी तिच्या कुटुंबीयांसमक्ष तिचा जबाब घेतला. त्यादरम्यान पीडितेने आरोपी नरेशचे नाव उघड केले. तिच्या जबाबावरून आरोपी नरेश बारसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.