९९ टक्के व्यावसायिक संकुले अनधिकृत!

By Admin | Updated: July 14, 2016 23:55 IST2016-07-14T23:55:37+5:302016-07-14T23:55:37+5:30

महापालिका हद्दीतील ९९ टक्के व्यावसायिक संकुले आणि फ्लॅट सिस्टिम अनधिकृत असल्याची माहिती दस्तुरखुद्द एडीटीपींनी दिली आहे.

99 percent of commercial packages unauthorized! | ९९ टक्के व्यावसायिक संकुले अनधिकृत!

९९ टक्के व्यावसायिक संकुले अनधिकृत!

महापालिकेत देशमुखांची बैठक : १२६ संकुलधारकांना नोटीस
अमरावती : महापालिका हद्दीतील ९९ टक्के व्यावसायिक संकुले आणि फ्लॅट सिस्टिम अनधिकृत असल्याची माहिती दस्तुरखुद्द एडीटीपींनी दिली आहे. यासंदर्भात संबंधितांना नोटीस देऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आ. सुनील देशमुख यांनी दिले आहे. शुक्रवारी आ. देशमुख यांनी महापालिकेत विविध विषयांचा आढावा घेतला.
अनेक व्यावसायिक संकुलासह फ्लॅटमधील पार्किंगची जागा गिळंकृत करण्यात आली आहे. अशा १२६ संकुलधारकांना महापालिकेकडून नोटीसेस पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. त्यावर ज्या व्यावसायिक संकूल आणि फ्लॅट सिस्टीम धारकांनी पालिकेकडून आॅकोपन्सी वा कम्प्लायन सर्टिफिकेट घेतलेली नाहीत. त्या इमारती अनधिकृत ठरतात. त्या पार्श्वभूमिवर शेकडा ९९ टक्के संकुलधारकांनी महापालिकेतून पूर्णत्वाचा दाखला मिळवला नसल्याचे बैठकीदरम्यान सांगण्यात आले. संबंधित संकुल धारकांनी विहीत वेळेत कम्प्लायन सर्टीफिकेट घ्यावे, अन्यथा दुप्पट टॅक्स वस्तुनिष्ठ सामोरे जावे, असा इशारा देण्यात आला. रहिवासी इमारतीऐवजी प्राधान्याने व्यावसायिक संकुलाच्या पार्किंगचा मुद्दा हाताळण्याच्या सूचना देशमुख यांनी केल्या. याखेरिज रमाई आवास योजना, पीएम आवास योजना, स्मार्टसिटी या विषयांचा आढावा घेण्यात आला. शहरातील महापालिकांच्या शाळांना आता त्या त्या परिसराचे नाव देण्यात येणार आहे. बैठकीला मनपा अधिकाऱ्यांसह नगरसेवक प्रदीप दंदे, प्रकाश बन्सोड, बाळासाहेब भुयार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

अतिक्रमण मोहिमेचे कौतुक
आरोप-प्रत्यारोपानंतरही महापालिकेची अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याने आ. देशमुख यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी यंत्रणेचे कौतुक केले. इतवारा बाजार, चांदणी चौक, वलगाव रोड परिसरातील अतिक्रमण हटविल्याने शहरवासियांना हायसे वाटल्याची प्रतिक्रिया प्रदीप दंदे यांनी दिली. एकंदरीतच पवारांच्या नेतृत्वातील सर्वंकष मोहीमेचे कौतुक करण्यात आले.

Web Title: 99 percent of commercial packages unauthorized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.