शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

दमदार पावसाने खरिपाची ९६ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात १० जुलैनंतर मान्सून सक्रिय झाल्यानंतर सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या ९६ टक्के पेरण्या आटोपल्या ...

अमरावती : जिल्ह्यात १० जुलैनंतर मान्सून सक्रिय झाल्यानंतर सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या ९६ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत ६,६४,५९१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली असली तरी अद्याप ३४,१९७ हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पावसाची रिपरीप सुरू असल्याने आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व पेरण्या आटोपणार आहेत.

यंदाच्या खरिपाकरिता जिल्ह्यात ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. जिल्ह्यात १० जूनला मान्सूनचे आगमन झाल्याने खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली. मात्र, मान्सून सक्रिय झालाच नाही. पाऊस विखुरत्या स्वरूपात झाला. त्यातही ३० जून ते ९ जुलैपर्यत पावसाचा खंड राहिला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या थबकल्या तर किमान २५ हजार हेक्टरमधील पिकांना मोड आली.

पुन्हा ९ जुलैनंतर पावसाची रिपरीप सुरू झाल्याने पेरण्यांची लगबग सुरू झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यत ६,६४,५९१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपलेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ४४,५०८ हेक्टर, चिखलदरा २४,४७१, अमरावती ५३,२६८, भातकुली ४९,२६४, नांदगाव खंडेश्वर ६३,४७४, चांदूर रेल्वे ३९,१५७, तिवसा ४०,२३४, मोर्शी ५५,४४८, वरुड ५०,०६२, दर्यापूर ७३,००२, अंजनगाव सुर्जी ४०,१७६, अचलपूर ३८,८५०, चांदूर बाजार ३८,६२१ व धामणगाव तालुक्यात ५४,०२८ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

बॉक्स

सोयाबीनची सर्वाधिक पेरणी

जिल्रल्णीह्यात सोयाबीनचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,७४८ हेक्टर, चिखलदरा ८,८६०, अमरावती ३१,३७६, भातकुली २८,६७१, नांदगाव खंडेश्वर ४७,६२१, चांदूर रेल्वे २३,६६१, तिवसा १७,१४०, मोर्शी १३,६०२, वरुड १,७५७, दर्यापूर १२,२६४, अंजनगाव सुर्जी १४,१६८, अचलपूर ८,८५०, चांदूर बाजार १२,३७८ व धामणगाव तालुक्यात २४,५३१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

बॉक्स

कपाशीची २,२२,२४६ हेक्टरमध्ये पेरणी

यंदा कपाशीची २,२२,२४६ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,३०० हेक्टर, चिखलदरा २,४१२, अमरावती १३,६४०, भातकुली १०,९४३, नांदगाव खंडेश्वर ६,०७६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १६,६७८, मोर्शी २५,५९२, वरुड २७,८६४, दर्यापूर ३१,९५६, अंजनगाव सुर्जी १४,९५२, अचलपूर १७,८७१, चांदूर बाजार १५,५८९ व धामणगाव तालुक्यात २१,०८७ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

पाॅईंटर

अशी झाली पेरणी

धान ५,६५२ हेक्टर

ज्वारी १४,३४१ हेक्टर

मका १७,७४२ हेक्टर

तूर १,१९,३०६ हेक्टर

मूग १६,३८० हेक्टर

उडीद ५,५६२ हेक्टर