९५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:13 IST2021-05-25T04:13:07+5:302021-05-25T04:13:07+5:30

अमरावती : कोविडबाधित झाल्यानंतर येथील जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेऊन बरे होऊन ९५ वर्षांच्या वृद्धेने कोरोनावर मात केली आहे. ...

95-year-old grandmother overcomes corona | ९५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

९५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

अमरावती : कोविडबाधित झाल्यानंतर येथील जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेऊन बरे होऊन ९५ वर्षांच्या वृद्धेने कोरोनावर मात केली आहे.

मनकर्णाबाई कडू असे या आजीबाईंचे नाव आहे. त्या अचलपूर तालुक्यातील भूगाव येथील रहिवासी आहेत. कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांना १५ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोमवारी घरी परतण्याची परवानगी देण्यात आली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. निलेश पाटील, डॉ. रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांनी आजीबाईंचे अभिनंदन केले. त्या घरी परतल्या असून, प्रकृती चांगली आहे. उपचारादरम्यान त्यांनी संपूर्ण सहकार्य केले, अशी माहिती सुपर स्पेशालिटी स्थित जिल्हा कोविड रुग्णालयातील स्टाफने यावेळी दिली. योग्य उपचारांनी कोरोना पूर्णपणे बरा होतो. संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छता यांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: 95-year-old grandmother overcomes corona