उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९७ टक्के जलसाठा
By Admin | Updated: September 4, 2015 00:27 IST2015-09-04T00:27:18+5:302015-09-04T00:27:18+5:30
जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील एक मुख्य व चार मध्यम प्रकल्पात पूर्णसंचय पातळीएवढा जलसाठा आहे.

उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९७ टक्के जलसाठा
दिलासा : चार मध्यम प्रकल्पांत ८२ टक्क््यांवर साठा
अमरावती : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील एक मुख्य व चार मध्यम प्रकल्पात पूर्णसंचय पातळीएवढा जलसाठा आहे. सर्वाधिक ९७.३९ टक्के जलसाठा हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात आहे. चार मध्यम प्रकल्पात सद्या सरासरी ८२ टक्के जलसाठा आहे.
उध्व वर्धा प्रकल्पात मध्यप्रदेशातून येवा अधिक प्रमाणात झाला. तसेच मोर्शी व वरुड तालुक्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सद्यस्थितीत धरणाची पूर्ण संचय पातळी ३४२.५० मीटरच्या तुलनेत ३४२.३४ मीटर जलसाठा आहे. आजचा उपयुक्त जलसाठा ५४९.३३ दलघमी एवढा आहे. जिल्ह्यात शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सापन असे चार प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर प्रकल्पात ४४९.५० मीटर पूर्णसंचय पातळीच्या तुलनेत ४४६.७७ मीटर जलसाठा आहे. आजचा उपयुक्त जलसाठा ३८.५० दलघमी आहे. ही ८३.६२ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात ५०६.२० मीटर पूर्णसंचय पातळीच्या तुलने ५०३.६० मीटर जलसाठा आहे. ही ८०.९२ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात ४५२ मीटर जलसाठा आहे ही ८०.९२ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात ४५२ मीटर पूर्ण जलसंचय पातळीच्या तुलनेत ४५०.८९ मीटर जलसाठा आहे. आजचा उपयुक्त जलसाठा ३०.३६ दलघमी आहे. ही ८५.८४ टक्केवारी आहे. सपन प्रकल्पात ५१४.५० मीटर पूर्ण संचय पातळीच्या तुलनेत ५११.३० मीटर जलसाठा आहे. हा साठा ३२.०१ दलघमी आहे व ८२.९३ टक्केवारी आहे. तुर्तास प्रकल्पांची ही स्थिती समाधानकारक आहे.