पश्चिम विदर्भात ९२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:07 PM2019-09-27T16:07:47+5:302019-09-27T16:09:56+5:30

अमरावती जिल्ह्यात ८, अकोला ५, यवतमाळ ७, बुलडाणा ७ व वाशीम जिल्ह्यात ३ असे एकूण ३० विधानसभा मतदारसंघ आहेत.

92 lakh voters will be entitled to vote | पश्चिम विदर्भात ९२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पश्चिम विदर्भात ९२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Next

अमरावती - पश्चिम विदर्भातील ३० मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज घेणे व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर असली तरी दरम्यान तीन दिवस सार्वजनिक सुट्या आल्यामुळे अर्ज सादर करण्याला प्रत्यक्षात पाचच दिवस मिळणार आहेत. 

विभागात अमरावती जिल्ह्यात ८, अकोला ५, यवतमाळ ७, बुलडाणा ७ व वाशीम जिल्ह्यात ३ असे एकूण ३० विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एकूण ९१,८८,४१६ मतदार मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहेत. यात ४७,६५,१८१ पुरुष, ४४,२३,०९७ स्त्री व १३८ इतर मतदारांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २४,४८,९४३, अकोला जिल्ह्यात १५,७४,०९१, यवतमाळ जिल्ह्यात २१,७२,२०५, वाशीम जिल्ह्यात ९,५३,७४२, बुलडाणा जिल्ह्यात २०,३९,४३५ मतदारांचा समावेश आहे. यापैकी ८८,५६,०४३ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र आहेत, तर ८८,८१,५३९ मतदारांजवळ मतदार ओळखपत्र आहेत. विभागात एकूण १०,१४५ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १६२६, अकोला १७०३, यवतमाळ २४९९, वाशीम १०५२ व बुलडाणा जिल्ह्यात २२६३ मतदान केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण ९३६ एसटी बसेस, झोन अधिकाऱ्यांकरिता ८८९ वाहने, निवडणूक अधिकाºयांकरिता ११४ वाहने, आरओ, इआरओ, एआरओ व ऑब्झर्व्हरसाठी ११४ वाहने लागणार आहेत.

७४,४०० अधिकारी, कर्मचारी उपलब्ध

अमरावती विभागातील ३० मतदारसंघांसाठी ५२,४५० अधिकारी, कर्मचाºयांची आवश्यकता असली तरी प्रशासनाजवळ सद्यस्थितीत ७६,४०० मनुष्यबळ उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी १४१४, मायक्रो आब्झर्व्हर, ९४९ झोन अधिकारी, १७५ भरारी पथक, १२४ एसएसटी टीम, १०५ व्हीव्हीटी टीम, ५४ व्हीएसटी टीम व ५० अकाऊंट टीम राहणार आहे.

१४८ केंद्रे क्रिटिकल

पश्चिम विदर्भातील १४८ मतदान केंद्र हे क्रिटिकल ठरविण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वाधिक ७१ केंद्रे यवतमाळ जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्ह्यात ३७, अकोला १२, वाशीम २८ व बुलडाणा जिल्ह्यात निरंक आहे. आतापर्यंत राजकीय पक्षाचे १३,८०५ पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज, १०,५२६ झेंडे काढण्यात आलेले आहेत. मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत ४५६ कारवाया करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.
 

Web Title: 92 lakh voters will be entitled to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.