नागरी सुविधांसाठी ९२ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:13 IST2021-04-09T04:13:20+5:302021-04-09T04:13:20+5:30
दर्यापूर/ अमरावती: अमरावती व दर्यापूर तालुक्यांतील गावठाणातील पूर पुनर्वसित भागात नागरी सुविधांसाठी सुमारे ९२ लाख १४ हजार रुपये निधी ...

नागरी सुविधांसाठी ९२ लाखांचा निधी
दर्यापूर/ अमरावती: अमरावती व दर्यापूर तालुक्यांतील गावठाणातील पूर पुनर्वसित भागात नागरी सुविधांसाठी सुमारे ९२ लाख १४ हजार रुपये निधी वितरणास महसूल व वने विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्याला हा निधी मिळून लवकरच ही कामे सुरू होतील. कामाच्या प्रगतीनुसार पुढील टप्प्यातील निधीही वेळेत उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिली.
अमरावती तालुक्यातील देवरी, रेवसा, पुसदा व देवरा या गावठाणातील पूर पुनर्वसित भागात रस्ते, नाली बांधकाम व विविध नागरी सुविधांसाठी प्रशासकीय मान्यता यापूर्वीच प्राप्त आहे. या सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात ३७ लाख १४ हजार रुपए निधी वितरित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, दर्यापूर तालुक्यातील बाभळी भाग-१, बाभळी भाग-२, बाभळी भाग- ३, दर्यापूर भाग-१, सांगोवा खु, कान्होली येथे रस्ते बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. दर्यापूर तालुक्यात बाभळी भाग-१, बाभळी भाग- २ व बाभळी भाग -३ या पुनर्वसित गावांत ३० लक्ष २५ हजार रुपये निधीतून अंतर्गत खडीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. दर्यापूर भाग- १ या पुनर्वसित भागात दोन लाख निधीतून अंतर्गत खडीच्या रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. सांगवा खुर्द येथे ११ लक्ष ५० हजार निधीतून व कान्होली येथे ११ लक्ष २५ हजार निधीतून अंतर्गत खडीरस्ते बांधकाम होणार आहे. अमरावती तालुक्यात देवरी गावठाणातील पुनर्वसित भागात ९ लक्ष ५५ हजार निधीतून अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, रेवसा येथे १२ लक्ष २१ हजार निधीतून अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, पुसदा येथे ११ लक्ष १५ हजार रुपये, तर देवरा येथे ४ लक्ष २३ हजार निधीतून रस्ते व नाली बांधकाम होणार आहे.