जिल्ह्यात खरिपाची ९० टक्के पेरणी

By Admin | Updated: July 31, 2015 00:46 IST2015-07-31T00:46:21+5:302015-07-31T00:46:21+5:30

यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून पाऊस कमी असल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

90% sowing of Kharif in the district | जिल्ह्यात खरिपाची ९० टक्के पेरणी

जिल्ह्यात खरिपाची ९० टक्के पेरणी

नांदगाव, दर्यापुरात सरासरी पार : ६७ टक्के अचलपुरात
अमरावती : यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून पाऊस कमी असल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. २९ जुलैअखेर जिल्ह्यात ९०.१९ टक्के पेरणी झाली. यामध्ये नांदगाव खंडेश्वर व दर्यापूर तालुक्यात नियोजित क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. या तुलनेत अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ६७ टक्केच पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप पेरणीकरिता ७ लाख १४ हजार ९५० क्षेत्राचे नियोजन केले होते. यापैकी ६ लाख ४४ हजार ७९४ हेक्टर क्षेत्रात बुधवारपर्यंत पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, एक लाख ७७ हजार १५५ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. ९८ हजार ३१८ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी करण्यात आलेली आहे. ७ हजार ९५० हेक्टरमध्ये धान, १२ हजार ९७३ हेक्टरमध्ये ज्वारी, १० हेक्टरमध्ये बाजरी, ५ हजार १४७ हेक्टरमध्ये मका, १९ हजार हेक्टरमध्ये मूग, ५ हजार ४२६ हेक्टरमध्ये उडीद, ४४२ हेक्टरमध्ये इतर कडधान्य, ९०८ हेक्टरमध्ये भूईमूग, ३० हेक्टरमध्ये तीळ, ४ हेक्टरमध्ये सूर्यफूल, ३ हजार ७२५ हेक्टरमध्ये भाजीपाल्याची लागवड झालेली आहे.
जिल्ह्यात धारणी तालुक्यात ४५० हजार हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही ८८ टक्केवारी आहे. चिखलदरा तालुक्यात २२ हजार ७२१ हेक्टर पेरणी झाली आहे.
अमरावती तालुक्यात ५३ हजार १६५ हेक्टर, भातकुली तालुक्यात ४८ हजार ५२५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६२ हजार ३६८ हेक्टर, चांदूररेल्वे ३७ हजार ५ हेक्टर, तिवसा ३७ हजार ५०७ हेक्टर, मोर्शी ५१ हजार ३३७ हेक्टर, वरुड तालुक्यात ४३ हजार ४११ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ६४ हजार ८९८ हेक्टर, अंजनगाव तालुक्यात ४० हजार ३९३ हेक्टर, अचलपूर तालुक्यात ३८ हजार ७९४ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ५१ हजार ४०४ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात ४७ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 90% sowing of Kharif in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.