जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण ९० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:12+5:302021-02-05T05:25:12+5:30

अमरावती : जिल्ह्यात रविवारी राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरणांतर्गत ९० टक्के बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात आला. यामध्ये ...

90 percent pulse polio vaccination in the district | जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण ९० टक्के

जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण ९० टक्के

अमरावती : जिल्ह्यात रविवारी राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरणांतर्गत ९० टक्के बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागात ९४ तर नागरी क्षेत्रात ७८ टक्के लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील गावांमध्ये १ लाख २७ हजार १६ तर नागरी क्षेत्रात २८,९५६ अशा एकूण १ लाख ५५,९७१ अशा दोन्ही मिळून जिल्हाभरात १ लाख ५५ हजार ९७२ बालकांना पल्स पोलिओ लसीचे डोस पाजण्यात आले आहेत.

बॉक्स

तालुकानिहाय लसीकरण

अचलपूर ११९५७, अमरावती ९३७६, अंजनगाव सुजी ६०९०, भातकुली ६७४४, चांदूर रेल्वे ३९८०, चांदूर बाजार ११९५१, चिखलदरा १०३३३, दर्यापूर ८०८०, धामनगाव रेल्वे ६६४३, धारणी १८२२७, मोशी ८४६७, नांदगाव खंडेश्वर ७६६८, तिवसा ६६९६, वरूड १०५०५ अशा एकूण १२,७०,०१६ बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय गावामध्ये लसीकरण करण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात २८,९९६ बालकांना लसीकरण करण्यात आले.

Web Title: 90 percent pulse polio vaccination in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.