महिलांवरील ९० टक्के अत्याचार परिचितांकडूनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST2021-04-08T04:14:03+5:302021-04-08T04:14:03+5:30

अमरावती/ संदीप मानकर अलीकडे महिलांवर, युवतींवर तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या व विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२० या वर्षात ...

90% atrocities against women by acquaintances only! | महिलांवरील ९० टक्के अत्याचार परिचितांकडूनच!

महिलांवरील ९० टक्के अत्याचार परिचितांकडूनच!

अमरावती/ संदीप मानकर

अलीकडे महिलांवर, युवतींवर तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या व विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२० या वर्षात महिलांवरी अत्याचाराच्या (बलात्कार)७९ घटना घडल्या. मात्र, ९० टक्के अत्याचाराच्या घटना परिचितांकडून घडल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे समोर आली आहे. १० टक्के अत्याचार हे अपरिचातांकडून घडल्याचे सांगण्यात आले.

तसेच लग्नाचे आमिष दाखवून, प्रेमप्रकरणातून, मित्राकडून, जवळच्या नातेवाकांकडून, पैशाचे आमिष दाखवून अशा घटना घडतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

२०१९ मध्ये बलात्काराच्या ८०, विनयभंग ३०७ तर हुडांबळीची एकही घटना घडली नाही. २०२० मध्ये बलात्काराच्या ७९, विनयभंगाच्या २८५ घटना घडल्या. मात्र, हुंडाबळीची एकही घटना पुढे आली नाही. मात्र सासरच्या मंडळीकडून विवाहित महिलेला मानसिक व शारीरिक छळाच्या शेकडो घटना वर्षभर घडल्या आहेत. यात महिला सेलने समेट घडवून अनेकांची संसाराची घडी पुन्हा बसविली. हे विशेष!

वर्षनिहाय आकडेवारी

बलात्कार - ७९

-८०

विनयभंग -२८५

-३०७

हुंडाबळी -०

-०

बलात्काराच्या घटना

परिचितांकडून -७०

अपरिचितांकडून-९

बॉक्स:

लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार

पोलीस आयुक्तलय हद्दीतील काही घटनांत लग्नाचे आमीष दाखवून युवतीवर अत्याचारा केल्याचे पुढे आले आहे. लग्नाचे आमीष दाखवून वारंवार अत्याचार केला. मात्र लग्न करण्यास नकार दिल्याच्या घटना फ्रेजरपुरा, गाडगेनगर व राजापेठ ठाणे हद्दीत अलीकडे पुढे आल्या आहेत.

कोट

महिलांवर कुठल्याही प्रकारे अत्याचार होत असेल तर महिलांनी पुढे आले पाहिजे. राज्यात हेल्पलाईन १०९१ टोल फ्री नंबरवर संपर्क करून तक्रार देऊ शकता. तसेच ऑनलाईन तक्रार देऊन एफआयआर नोंदवू शकता. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात दामिणी पथके तैनात केली आहेत.

आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती

Web Title: 90% atrocities against women by acquaintances only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.