९ गटशिक्षणाधिका-यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:50 IST2017-08-18T22:50:20+5:302017-08-18T22:50:20+5:30

जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त असलेल्या ९ पंचायत समिती अंतर्गत १८५वर्गखोल्या निर्लेखित करण्यासाठी पुढील कारवाई करण्याचे आदेश झेडपी प्रशासनाने  पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी व अन्य जबाबदार अधिकारी व मुख्याध्यापकांना  दिले होते.

9 Guidelines for prevention of staff teachers | ९ गटशिक्षणाधिका-यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश

९ गटशिक्षणाधिका-यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश

अमरावती, दि. 18 -  जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त असलेल्या ९ पंचायत समिती अंतर्गत १८५वर्गखोल्या निर्लेखित करण्यासाठी पुढील कारवाई करण्याचे आदेश झेडपी प्रशासनाने  पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी व अन्य जबाबदार अधिकारी व मुख्याध्यापकांना  दिले होते.मात्र यावर प्रशासकीय कारवाईत दप्तर दिरंगाई केल्याने ९  पंचायत समितीचे गटशिक्षणाधिका-या  आदीच्या जुलै पुढील वार्षीक वेतनवाढी रोखण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाºया जिल्हाभरातील १९० वर्गखोल्या शिकस्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवीन खोल्याचे बांधकाम करण्यास ६ जून २०१६ रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुढील कारवाई करण्याच्या सूचना झेडपी प्रशासनाने १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यामार्फत दिल्या होत्या १९० वर्गखोल्यापैकी ९ पंचायत समितीकडून ६५ प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आले. त्यानुसार वरील प्रस्तावानुसार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी वर्गखोली निर्लेखनाबाबतचे आवश्यक कारवाई करण्याचे कामात दप्तरदिरंगाई केल्याने चिखलदरा,धारणी,नांदगाव खंडेश्र्वर,मोर्शी,धामनगांव रेल्वे,दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी आदी ठिकाणच्या गटशिक्षणाधिका-यांच्या वेतन वाढी रोखण्याचे आदेश ४ आॅगस्ट रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिले आहेत.या निर्णया मुळे अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

वर्गखोल्याच्या निर्लेखनाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी वारंवार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांना कळविले. मात्र त्यानंतरही प्रस्ताव सादर करण्यात आले नाही. त्यामुळे याला दोषी असलेल्या अधिका-यांची जुलै महिन्यातील वेतन वाढ रोखली आहे.
- प्रकाश तट्टे,   अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी

Web Title: 9 Guidelines for prevention of staff teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.