गारपीटचा ९ कोटी ८६ लाखांचा निधी वितरित
By Admin | Updated: August 10, 2015 00:01 IST2015-08-10T00:01:45+5:302015-08-10T00:01:45+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवेळी पाऊस व गारपीट यामूळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते.

गारपीटचा ९ कोटी ८६ लाखांचा निधी वितरित
दिलासा : जिल्ह्यास १२ कोटी २४ लाख प्राप्त
अमरावती: जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवेळी पाऊस व गारपीट यामूळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. यासाठी जिल्ह्यास १२ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला होता. यापैकी ९ कोटी ८६ लाख ७७ हजार ८५० रुपयांचा मदत निधी आज तारखेपर्यंत १६ हजार २९० खातेदारांसाठी बँकेत जमा करण्यात आला आहे.
अवेळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात ७ तालुक्यात नुकसान झाले होते. यासाठी शासनाने १२ कोेटी २४ लाख ८२ हजाराचा निधी उपलब्ध केला. यापैकी अमरावती तालुक्यात ६ कोटी ४ लाख ९३ हजार २५०, धामणगाव १ कोटी ५६ लाख ३२ हजार ४००, भातकुली ९६ लाख २० हजार ८००, चांदूर बाजार ६७ लाख २ हजार, अचलपूर ३४ लाख ५ हजार, दर्यापूर १९ लाख ६ हजार, दर्यापूर तालुक्यात ८ लाख ७८ हजार ४००, १६ हजार २९० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
निधी वाटपाची ८०.५० टक्केवारी
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गारपिटीचा मदत निधी ८०.५७ टक्के वाटप करण्यात आला. यामध्ये अमरावती ७९.७१ टक्के धामणगाव ९०.७२ टक्के, भातकुली ७१.६९ टक्के, चांदूर बाजार ८९.०६ टक्के, अचलपूर ९०.०८ टक्के, दर्यापूर ७७.२२ व चिखलदरा तालुक्यात ४१.५३ टक्के वाटप करण्यात आला.