९८ कोटींमधून होणार छत्रीतलावाचा कायापालट
By Admin | Updated: July 25, 2016 00:04 IST2016-07-25T00:04:52+5:302016-07-25T00:04:52+5:30
शहराचे वैभव असलेल्या छत्रीतलावाचा 'साऊथ इंडियन थीम'च्या धर्तीवर सुमारे ९८ कोटी रूपयांच्या निधीतून कायापालट होणार असल्याची माहिती...

९८ कोटींमधून होणार छत्रीतलावाचा कायापालट
अमरावती: शहराचे वैभव असलेल्या छत्रीतलावाचा 'साऊथ इंडियन थीम'च्या धर्तीवर सुमारे ९८ कोटी रूपयांच्या निधीतून कायापालट होणार असल्याची माहिती रविवारी आ. रवी राणा यांनी दिली. छत्रीतलावाच्या विकास कामासाठी २४ जुलै रोजी आ. रवी राणा यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी किरण गिते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आयुक्त हेमंत पवार उपस्थित होते. छत्रीतलावाचा परिसर हा १८४ हेक्टर एवढा आहे. यात ८८ एकरांवर तलाव असून ५७ हेक्टर क्षेत्रावर छत्रीतलाव पर्यटनस्थळ विकसीत होणार आहे.तर ५८ हेक्टर क्षेत्र हे वनविभागाच्या ग्रीन झोन मध्ये येते. मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी पहिल्या १२.२५ क ोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाकरिता येत्या आठवडाभरात डीपीआरला महापालिकेची मान्यता घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उपलब्ध निधीतून दोन महिन्यांत कामाला सुरूवात हाईल. जिल्हाधिकारी कार्यालयात एका खासगी कंपनीने या बाबत प्रेझेंटेशन सादर केले. यामध्ये विविध आकर्षक अशा सुशोभिकरणाच्या सुविधांचा समावेश राहणार आहे. यावेळी नगरसेवक सुनील काळे, अजय मोरय्या उपस्थित होते. (प्रतिनिधी)