शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

९५८ शिक्षकांची विभागीय उपायुक्ताकडे सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:37 IST

जिल्हांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेणाºया विभागातील ९५८ शिक्षकांची विभागीय आयुक्तांनी सुनावणी सुरू केली आहे. १९ जुलैपासून सुरू झालेल्या या सुनावणी प्रक्रियेत जिल्हाभरातील ३४० शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

ठळक मुद्देचुकीची माहिती भरणाऱ्यांची पेशी : जिल्ह्यातील ३४० जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेणाºया विभागातील ९५८ शिक्षकांची विभागीय आयुक्तांनी सुनावणी सुरू केली आहे. १९ जुलैपासून सुरू झालेल्या या सुनावणी प्रक्रियेत जिल्हाभरातील ३४० शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत १४० शिक्षकांची विभागीय उपायुक्तांसमोर सुनावणी घेण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या २०१८ मध्ये झालेल्या बदलीसंदर्भात अन्यायग्रस्त शिक्षकांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. २३ मे ते ७ जुलै या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे विभागातील पाच जिल्ह्यांतून ९५८ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी शिक्षक बदली संदर्भातील तक्रारींची गंभीर दखल घेत पाचही जिल्ह्यातील शिक्षकांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. विभागीय आयुक्तांनी अमरावती जिल्ह्यातील ३४०, अकोला ८८, यवतमाळ १४०, बुलडाणा ३७८, वाशिममधील एकूण विभागाची ९५८ पडताळणी करण्याबाबत तक्रार असलेल्या शिक्षकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. १९ ते २१ जुलै दरम्यान तक्रारप्राप्त शिक्षकांची सुनावणी घेण्यात येत आहे. यात अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ३४० शिक्षकांसंदर्भात तक्रारी आहेत. यापैकी १३० शिक्षकांची विभागीय उपायुक्त गजेंद्र बावने यांनी सुनावणी घेतली आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके आदींच्या उपस्थितीत आॅनलाइन बदलीप्रकियेत चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांच्या दस्तावेजांची पडताळणी केली जात असून, संबंधिताचे म्हणने जाणून घेतले जात आहे. या शिक्षकांच्या सुनावणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर दोषी आढळून येणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होते, याकडे शिक्षण विभागातील सर्वांचे लक्ष लागले आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दीजिल्हांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती व खोट्या प्रमाणपत्रावर बदलीचा लाभ घेणाºया शिक्षकांसंदर्भात विभागातील पाचही जिल्ह्यांतून ९५८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सुनावणीसाठी विभागातून आलेल्या शिक्षकांची मोठी गर्दी विभागीय आयुक्त कार्यालयात दिसून आली. यामुळे या विभागाला यात्रेचे स्वरूप आले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण