शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

४,८८६ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी ८.८ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांना पूर्वसंमतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती देण्यात येते व त्याच्या ३० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संचउत्पादक कंपनी अथवा प्राधिकृत विक्रेत्यांकडून सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करावी लागेल. जिल्ह्यात २९ फेब्रुवारीअखेर ७८३५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६१२० अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली.

ठळक मुद्देचार दिवसांत पुन्हा १,२३४ प्रस्तावांकरिता २.०५ कोटी प्राप्त

  गजानन मोहोड    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाण्याचा दुरुपयोग रोखण्यात येऊन पाण्याचा योग्यरीतीने वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कृषी आयुक्तालयाकडून याकरिता ८१५.९३ लाखांचा निधी प्राप्त झाला व ४८८६ शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर ८०८.४३ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.  १२३४ प्रस्तावांकरिता २२४.८६ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत १४ डिसेंबरला २०५ लाखांचा निधी प्राप्त झाला व खर्च करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सन २०१८.१९ पर्यंत अनुदान अदायगी प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे कृषी विभागाने सांगितले. शेतकऱ्यांना पूर्वसंमतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती देण्यात येते व त्याच्या ३० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संचउत्पादक कंपनी अथवा प्राधिकृत विक्रेत्यांकडून सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करावी लागेल. जिल्ह्यात २९ फेब्रुवारीअखेर ७८३५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६१२० अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली.

प्रस्तावाला ही कागदपत्रे आवश्यकशेतकऱ्यांना ऑनलाईन प्रस्तावात  पूर्वसंमतिपत्र, सात/बारा उतारा, ८-अ चा उतारा, आधार कार्ड, आधार लिंक बँक पासबूकची सत्यप्रत, कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचनाचा आराखडा, बिलाची मूळ प्रत आदी कागदपत्रे महत्त्वाची आहेत.

योजनेत फेब्रुवारी २०२० अखेर ६१२० अर्ज प्राप्त झाले. त्यातील ६१२० अर्जांना पूर्वसंमती दिली व मोका पाहणी केली. ८०८.४३ लाखांचा निधी जमा करण्यात आला आहे.- विजय चवाळे, एसएओ

शासन योजनेंतर्गत विहीर खोदण्यात आल्यानंतर या योजनेत सूक्ष्म सिंचनासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्याचे अनुदान वर्षभरानंतर का होईना, प्राप्त झाले आहे. - संजय वानखडे, लाभार्थी, शेतकरी

असे मिळते अनुदान

 या योजनेंतर्गत दोन हेक्टर क्षेत्राच्या आतील लाभार्थींना (अल्प व अत्यल्प भूधारक) शेतकरी यांना ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. दोन हेक्टरवरील क्षेत्र असलेले लाभार्थी  व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प