धामणगाव परिसरात ८५ टक्के पेरण्या

By Admin | Updated: July 9, 2016 00:09 IST2016-07-09T00:09:01+5:302016-07-09T00:09:01+5:30

मृग नक्षत्रानंतर आद्राच्या उंदीराने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. तालुक्यात आता पर्यत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या असून...

85% sown in Dhamangaon area | धामणगाव परिसरात ८५ टक्के पेरण्या

धामणगाव परिसरात ८५ टक्के पेरण्या

कापसाचा वाढला पेरा : पावसाने बहरली पीके
धामणगाव रेल्वे : मृग नक्षत्रानंतर आद्राच्या उंदीराने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. तालुक्यात आता पर्यत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या असून ३२ हजार ७९२ हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे़ यंदा कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़
धामणगाव तालुक्यात ५५ हजार ४३८ हेक्टर पेरणी योग्य जमीन आहेत़ दरवर्षी प्रमाणे यंदाही कापसाचा पेरा वाढला आहे़ १३ हजार ९५४ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली आहे़ तर सोयाबीन १२ हजार ६१४ हेक्टरात टॅ्रक्टरने पेरणी झाली आहे़ तूर ४ हजार ८२४ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे़ उडीद ७८५ हेक्टर, मूग ६१५ हेक्टर अशी पेरणी झाली असल्याची माहिती पं़स़च्या कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण यांनी दिली़ तालुक्यात आतापर्यंत २६२़६० मि.मी़ पावसाची नोंद झाली आहे़ दमदार पावसामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी केलेली पिके बहरली आहेत़ यंदा पेरणीनंतर पाऊस आल्यामुळे पिके व्यवस्थित असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)

बगाजी सागरच्या पाण्याने खरडली जमीन
निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत बगाजी सागर धरणाचे पाणी सलग दोन दिवस सोडण्यात आले़ त्यामुळे नायगाव, आष्टा, सोनोरा काकडे, दिघी महल्ले या गावाच्या नदी शेजारी शेतातील पिके पूर्णत: जमीनसह खरडून गेली आहे़ दरवर्षी या सोडलेल्या पाण्याचा फटका संबधीत गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो़ प्रकल्पाचे पाणी सोडण्याची ऐनवेळी दवंडी दिली जात असल्यामुळे उन्हाळ्यात नदीकाठी बसविलेले मोटरपंप काढण्याकरीता अवधी मिळत नाही़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोटरपंप व पाईप या पाण्यात वाहून गेले आहेत़

Web Title: 85% sown in Dhamangaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.