गतवर्षीच्या तुलनेत ८३ मि.मी. पाऊस कमी

By Admin | Updated: July 27, 2015 00:20 IST2015-07-27T00:20:10+5:302015-07-27T00:20:10+5:30

जिल्ह्यात १९ जुलैपासून कमीअधिक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवार ते रविवार या २४ तासांत जिल्ह्यात १.४ मि.मी. पाऊस पडला.

83 mm compared to last year. Rain reduction | गतवर्षीच्या तुलनेत ८३ मि.मी. पाऊस कमी

गतवर्षीच्या तुलनेत ८३ मि.मी. पाऊस कमी

अमरावती : जिल्ह्यात १९ जुलैपासून कमीअधिक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवार ते रविवार या २४ तासांत जिल्ह्यात १.४ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये पाच तालुके निरंक राहिले. १ जून ते २९ जुलैदरम्यान जिल्ह्यात २९६ मि.मी. पाऊस पडला. गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत ८३.४ मि.मी.ने पाऊस कमी आहे.
जिल्ह्यात १ जून ते २६ जुलै दरम्यान पावसाची अपेक्षित सरासरी ३७७.९ मि.मी. असताना २९६ मि.मी. पाऊस पडला. हा सरासरीपेक्षा ८९.९ मि.मी.ने कमी आहे. मागील वर्षी याच तारखेला ३७९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वाधिक ४५४.१ मि.मी. पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. धारणी ३९६.२, तिवसा ३८०.८, वरूड ३६८.७, अचलपूर २३५.५, अमरावती ३१८.३, नांदगाव ३२१.३, भातकुली २३०.९, चांदूररेल्वे २५१.९, धामणगाव २३४, मोर्शी २८८, चांदूरबाजार २१६.८, दर्यापूर १७२.८, अंजनगाव २७५.३ असा सरासरी पाऊस पडला आहे.

Web Title: 83 mm compared to last year. Rain reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.