८३९ ग्रा.पं.ना साडेतीन कोटी

By Admin | Updated: September 6, 2016 00:14 IST2016-09-06T00:14:20+5:302016-09-06T00:14:20+5:30

चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, जिल्ह्यातील ग्रामीण स्वराज्य संस्थांना निधी वितरित करण्यासाठी ...

83 million p.m., three crores | ८३९ ग्रा.पं.ना साडेतीन कोटी

८३९ ग्रा.पं.ना साडेतीन कोटी

जिल्हा परिषद : १४ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता
अमरावती : चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, जिल्ह्यातील ग्रामीण स्वराज्य संस्थांना निधी वितरित करण्यासाठी सन २०१६-१७ च्या जनरल बेसिक ग्रँटचा पहिला हप्ता राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींना सुमारे ३ कोटी ४९ लाख १४३ रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
चौदाव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले अनुदान ग्रामपंचायतींना वितरित करावे लागणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या बीम्सवर जमा करण्यात आलेला सुमारे ३ कोटी ४९ लाख १४३ रूपयांचा निधी कोषागारातून काढून १४ व्या वित्त आयोगासाठी स्वतंत्र्यपणे उघडलेल्या बँक खात्यात जमा करावा लागणार आहे. त्यानंतर हा निधी सीईओंमार्फत संपूर्ण निधी हा विहीत वाटपाच्या निकषांच्या आधारे त्याच्या अधिनस्त असलेल्या ग्रामपंचायतींना इ.सी.एस. एन.इ.एफ.टी. व आर.टी.जी.एस.या आधुनिक बॅकिंग सिस्टीमव्दारे संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर येत्या दोन आठवड्यांच्या आत वर्ग केला जाईल.

डेप्युटी सीईओंचे नियंत्रण
चौदाव्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या वितरणाचे नियोजन, सनियंत्रण व समन्वयककांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) यांच्या शासनाने सोपविली आहे.

अतिरिक्त खर्चाला मनाई
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारे निधी दिला जाणार आहे. मात्र या निधीतून शासनाने ठरवून दिलेल्या विकास कामांवरच उपलब्ध निधीनुसारच खर्च करावा लागणार आहे. यापेक्षा जास्तीचे दायित्व निर्माण केल्यास त्यासाठी निधी मिळणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे.

Web Title: 83 million p.m., three crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.