शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

८३ लाखांचे बोगस एअर व्हॉल्व्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:50 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : सिंभोरा येथून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले एअर व्हॉल्व्ह बसविले आहेत. ८७ एअर व्हॉल्व्हकरिता ८३ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्याच्याच परिणामी महिन्याभरात चार ते पाच वेळा दोन-तीन दिवसांकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ओढवली आहे.राज्यात अन्य शहरांकरिता मॉडेल ...

ठळक मुद्देमजीप्रात पाणी मुरतेय : महानगरात पाणीपुरवठ्याचे तीनतेरा

आॅनलाईन लोकमतअमरावती : सिंभोरा येथून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले एअर व्हॉल्व्ह बसविले आहेत. ८७ एअर व्हॉल्व्हकरिता ८३ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्याच्याच परिणामी महिन्याभरात चार ते पाच वेळा दोन-तीन दिवसांकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ओढवली आहे.राज्यात अन्य शहरांकरिता मॉडेल ठरलेल्या अमरावती पाणीपुरवठा योजनेला मजीप्रा अधिकाऱ्यांनी ग्रहण लावले आहे. पाणीपुरवठा योजना ही नव्याने अमृत अभियानांतर्गत राबविली जात आहे. २०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर टॅम्परप्रूफ ११२ एअर व्हॉल्व्ह बसविण्यासंदर्भात २०१६ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिक येथील कंत्राटदार पी.एल. आडके यांनी ८७ एअर व्हॉल्व्ह बसविले. मात्र, तरीदेखील मुख्य जलवाहिनी एअर लॉक होत असल्याचा अहवाल मजीप्राच्या उपविभागीय अभियंत्यांनी वरिष्ठांना १५ जानेवारी २०१७ रोजी दिलेला आहे. परंतु, मजीप्राच्या वरिष्ठांनी एअर व्हॉल्व्हचा पुरवठा करताना ‘पाणी’ मुरविल्याने या महत्त्वपूर्ण तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष चालविले.एअर तपासणीतून खुलासासातत्याने जलवाहिनीला लीकेजची समस्या मजीप्राने गाभीर्याने घेतली नाही. यापूर्वी १५०० मिमी पी.एस.सी. गुरुत्ववाहिनीवर बसविलेल्या एअर व्हॉल्व्ह क्र. ५९ ची तांत्रिक तपासणी करण्यात आली. मात्र, पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर एअर व्हॉल्व्हमधून पास होणारी एअरची तपासणी केली असता, एअर व्हॉल्व्ह लॉक झाल्याचे दिसून आले. ही तपासणी नाशिक येथील मयूर कंपनीचे तंत्रज्ञ सुमीत सिंग यांच्यासह मजीप्राचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता हजर होते. ८३ लाखांचे बोगस एअर व्हॉल्व्ह पुरवठा करून ते गुरुत्ववाहिनीवर बसविले असताना, ही बाब मजीप्राच्या अधिकाºयांनी दडवून ठेवली, हे विशेषएअर लॉकमुळे जलवाहिनीला लीकेजगत चार महिन्यांपासून मजीप्राच्या मुख्य जलवाहिनीला एअर लॉकच्या फटक्याने लीकेज होत आहे. परिणामी अमरावती शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. सतत मुख्य जलवाहिनीला लीकेज होण्यास एअर लॉक कारणीभूत ठरले आहे.नागरिकांना मनस्तापसलग चार महिन्यांपासूनसतत पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता तर दिवसाआड पाणीपुरवठ्याने अमरावतीकर हैराण झाले आहेत. काही भागात नवीन जलवाहिनी टाकली जात असून, होत असलेल्या खोदकामाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मजीप्राचा पर्दाफाश होईल विधिमंडळातमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक दोष असलेले एअर व्हॉल्व्ह खरेदी करून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. ही बाब अत्यंत गंभीर असून, मजीप्राचा पर्दाफाश येत्या उन्हाळी अधिवेशनात केला जाईल, असे आ. सुनील देशमुख ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. त्यांनी गुरुवारी मजीप्रात घेतलेली आढावा बैठक याच मुद्द्यावर गाजली होती.जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हबाबत अहवाल मागविला आहे. यात काही त्रुटी राहिल्या तर नाही, हेदेखील तपासले जाईल. एअर व्हॉल्व्हमध्ये किरकोळ समस्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.- एस.एस. चारथळ, अधीक्षक अभियंता, मजीप्रा