८१ पॉझिटिव्ह, एकूण १२२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:32+5:30

दिवसभरात ८१ संक्रमितांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२२८ वर पोहोचली आहे. या दोन दिवसांत ११३९ जण संक्रमित निष्पन्न झाले आहे. उपचारादरम्यान बडनेरा येथील ८० वर्षे वृद्धाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे.

81 positive, total 1228 | ८१ पॉझिटिव्ह, एकूण १२२८

८१ पॉझिटिव्ह, एकूण १२२८

ठळक मुद्देसर्वाधिक । दोन दिवसांत १३९ जण संक्रमित, एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. श्निवारी दिवसभरात ८१ संक्रमितांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२२८ वर पोहोचली आहे. या दोन दिवसांत ११३९ जण संक्रमित निष्पन्न झाले आहे. उपचारादरम्यान बडनेरा येथील ८० वर्षे वृद्धाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे.
शनिवारी जेल क्वार्टर येथे १८ व २२ वर्षीय, धारणी क्वारंटाईन सेंटररमध्ये ३५ वर्षीय, चिलम छावणी येथे ४७ वर्षीय, वरूड येथे ४७ वर्षीय, वॉलकट कंपाऊड येथे २१ वर्षीय, नवजीवन कॉलनीत २५ वर्षीय, व अन्य एक २४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तर धारणी क्वारंटाईन सेंटरला २८, ३२ व ४३ वर्षीय, भाजीबाजारला ४८ वर्षीय, नवजीवन कॉलनीत ३० वर्षीय, एकविरानगरात ४८ वर्षीय, खोलापुरी गेट येथे ४३ वर्षीय, पीडीएमसी येथे ३० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉजटिव्ह आला. तपोवन येथे ३१ वर्षीय, कॅम्प येथे ४७ वर्षीय, नांदगाव खंडेश्वर येथे ६२ वर्षीय, गोपालनगरात १२ व ३९ वर्षीय, अंजनगाव सुर्जी येथे २३ व ५१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विजयपथनगरात ३८ वर्षीय, न्यू काँग्रेसनगरात ५५ वर्षीय, रतनगंजमध्ये ५५ वर्षीय, पीडीएमसीत २७ वर्षीय दोन पुरुष व बजरंगनगरात २३ वर्षीय, चपराशीपुऱ्यात १६ वर्षीय बालिका व ५० वर्षीय महिला तसेच रुक्मिणीनगरात ४ वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
अचलपूर येथे ३९ वर्षीय, साजिया नगरात २५ वर्षीय, पूर्णानगर येथे २०, २६, ५३ व ५८ वर्षीय, पुनर्वसन कॉलनीत ६२ वर्षीय, लुंबिनीनगरात २२ वर्षीय पुरुष व तारखेडला ९ वर्षीय बालक, तसेच पूर्णानगरात २६ व ५८ वर्षीय महिला, साजियानगरात २२ वर्षीय, पूर्णानगरात ५५ वर्षीय, कॅम्प येथे ४८ वर्षीय, यावली शहीद येथे २१ व ४० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटव्ह आला, रॅपिड टेस्टमध्ये जुन्या बायपासवर धनुवाडीला ४२ वर्षीय दोन व्यक्ती, अकोली येथे ४३ वर्षीय, सराफामध्ये २३ वर्षीय पुरुष व रामपुरी कॅम्प येथे ४५ वर्षीय, खोलापुरी गेट येथे २७ व ५३ वर्षीय, धनुवाडी येथे ११ वर्षीय, सराफा येथे २८ वर्षीय, दसरा मैदान येथे ४६ वर्षीय व खापर्डे बगीचा येथे ३३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रवीणनगरात ६५ वर्षीय, पीडीएमसी २५ वर्षीय, हमालपूरा येथे ६० वर्षीय, उत्तमनगरात २८ वर्षीय,गाडगेनगरात २२ वर्षीय, परतवाड्यात ३५ वर्षीय, व्हिनसपार्क येथे ५९ वर्षीय, व रामपूरी कॅम्प येथे ५५ वर्षीय महिला व ५ वर्षीय बालिका तसेच नेरपिंगळाई येथे ४० वर्षीय पुरुष, बडनेरा येथे ३० वर्षीय, आनंदनगरात ३५ वर्षीय, कृष्णनगरात २५ वर्षीय, शिरजगाव कसबा येथे २८ वर्षीय, जयनगरात ३६ वर्षीय, आशिफनगरात ३८ वर्षीय, खापर्डे बगीच्या येथे ४२ वर्षीय, रुख्मिनीनगरात ४४ वर्षीय, व्हीनस पार्क येथे ८३ वर्षीय, झमझनगरात ४२ वर्षीय, नवसारीत २० वर्षीय, दर्यापूरात ५४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Web Title: 81 positive, total 1228

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.