शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रमाई आवास योजनेचे आठ हजार घरकुल रखडले, केवळ १४३३ पूर्ण, उद्दिष्ट ८.४५ टक्के साध्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 17:48 IST

अमरावती : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जातीमधील गरजू व्यक्तींना हक्काचा निवारा मिळावा व त्यासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेचे काम अमरावती विभागात समन्वयाअभावी रखडले आहे.

अमरावती : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जातीमधील गरजू व्यक्तींना हक्काचा निवारा मिळावा व त्यासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेचे काम अमरावती विभागात समन्वयाअभावी रखडले आहे. ९,४५२ लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,४३३ घरकुल पूर्ण झाले आहेत. अद्याप ८,०१९ घरकुल रखडले आहेत. साध्य उद्दिष्ट केवळ ८.४५ टक्केच आहे.शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निकषपात्र लाभार्थींना एक लाखाचे अनुदान देण्यात येते. यासाठी २००२ ते २००७ मध्ये कुटुंबगणना झालेल्या यादीतील २१ गुणांच्या आतील इंदिरा आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थींची नावे ग्रामसभेने मंजूर केलेल्या प्रतीक्षा यादीत असणे अनिवार्य आहे. जिल्हा ग्रामीण विकास योजनाद्वारा गावांची निवड करण्यात येते. त्यानंतर पंचायत समिती स्तरावर यादीला प्रशासकीय मान्यता देण्यात येते. १ एप्रिल २०१३ नंतर मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांना पहिला व दुसरा हप्ता ३५ हजार आणि त्यानंतर तिसरा २५ हजार रुपयांचा हप्ता पंचायत समिती स्तरावर धनादेशाद्वारे लाभार्थींना दिला जातो.अमरावती विभागात या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी १,६९२, अमरावती २,२९२, बुलडाणा २,६३६, वाशिम १,१६६ व यवतमाळ जिल्ह्यासाठी १,६६६ असे एकूण ९,४५२ घरकुलांचे लक्ष्यांंक असताना प्रत्यक्षात अकोला जिल्ह्यात १४३ अमरावती ४५०, बुलडाणा ३९२, वाशिम १५४, तर यवतमाळ जिल्ह्यात २९४ असे एकूण १,४३३ घरकुल पूर्ण झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. तालुकास्तरावर समन्वय नसल्यामुळेच कामे रखडली असल्याचा आरोप होत आहे.पारधी आवास योजनेचे ४६५ घरकुल बाकीसदैव भटकत राहणारा पारधी समाजदेखील मुख्य धारेत यावा, यासाठी पारधी आवास योजनेंतर्गत घरकुलांची योजना आहे. अमरावती विभागात २०१६-१७ या कालावधीत ५,९७ लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात १३२ घरकुल पूर्ण झाले यामध्ये अकोला जिल्ह्यात २४, अमरावती ५९, बुलडाणा २६, वाशिम ६ व यवतमाळ जिल्ह्यात १७ अशी संख्या आहे. उर्वरित ४६४ घरकुलांची कामे रखडलेलीच आहेत.

टॅग्स :HomeघरAmravatiअमरावती