शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दुष्काळी २८ तालुक्यांना ८०० कोटींचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:30 IST

यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे. आतापर्यंत ४७४ कोटी ३६ लाखांची मदत वितरित करण्यात आली, तर २२ फेब्रुवारीला तिस-या टप्प्याचे ३२६ कोटी पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले. सद्यस्थितीत सहा लाख ८९ हजार ७२८ शेतक-यांच्या बँक खात्यात ३४६ कोटी ९७ लाखांचा मदतनिधी जमा करण्यात आलेला आहे.दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ च्या निकषानुसार विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागल्याने शासनाने ३१ ऑक्टोबर २०१८ ला २८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. याच तालुक्यांना २५ जानेवारीला दुष्काळनिधीची मदत जाहीर केली. या सर्व तालुक्यांत पीक कापणी प्रयोगानंतर कृषी विभागाद्वारा सत्यापन करण्यात आले होते. त्यानुसार या सर्व तालुक्यांत ६,७२,६६३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने केंद्रीय आपदा निधीमधून ही मदत देण्यात येत आहे. कृषी विभागाच्या सत्यापनानुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ४२,९८८ हेक्टर, चिखलदरा २२,९७६, मोर्शी ५८८४९, वरूड ४९४१४, अंजनगाव सुर्जी ४१६९५, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात ४७३१, अकोला ३६४, तेल्हारा ५४५९, बाळापूर ६२९६, बार्सी टाकळी २३११ यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात ६२.२९, बाभुळगाव ५९.९९, कळंब ८६.८६, राळेगाव ७८.८९, मारेगाव ९१.७७, केळापूर १३८.२३, दारव्हा ६४.७७, महागाव ७५.२२ व उमरखेड तालुक्यात ८०.४ हेक्टर बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात ५८७१४ हेक्टर, मलकापूर ४२३५७, खामगाव ७५३७०, शेगाव ४६७५३, नांदूरा ५०१०४, संग्रामपूर ४२७१४, लोणार ५२४२४, व सिंदखेडराजा ६४१०१ तसेच वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात ४३०३.१९ हेक्टरसाठी ही मदत आहे.कमी पैसेवारीच्या ४७९१ गावांना डावलले दुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ ऑक्टोबरला विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. यामध्ये २००७ गावांत दुष्काळ स्थिती शासनाने जाहीर केली व आता एनडीआरएफचा मदतनिधी देखील वितरित केला. महसूल विभागाने ३१ डिसेंबरला खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जाहीर दुष्काळी गावे वगळता ४७९१ गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी आहे. मात्र, या गावांना मदतनिधीत डावलण्यात आले, तर दुष्काळासंदर्भातील फक्त आठ सवलतींवर या गावांची बोळवण करण्यात आलेली आहे.

 असा मिळाला जिल्हानिहाय निधी अमरावती जिल्ह्यात ७३८ गावांतील १४९८५७ शेतक-यांसाठी १८६ कोटी ३६ लाख, अकोला जिल्ह्यात ६२३ गावांतील १४९६१८ शेतक-यांसाठी १३७ कोटी ६१ लाख, बुलडाणा जिल्ह्यातील ५९९ गावांतील १९८००६ शेतक-यांसाठी १९९ कोटी ६५ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १११६ गावांतील २३४४१८ शेतक-यांसाठी २३२ कोटी ६७ लाख व वाशिम जिल्ह्यात १०० गावांतील ५५११५ शेतक-यांसाठी ४४ कोटी १० लाखांचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे.