१४४ मतदान केंद्रांसाठी ७९० कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:12+5:302021-01-15T04:12:12+5:30
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. चार ग्रामपंचायती व तीन प्रभाग अविरोध झाल्याने ...

१४४ मतदान केंद्रांसाठी ७९० कर्मचारी तैनात
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. चार ग्रामपंचायती व तीन प्रभाग अविरोध झाल्याने आता १४४ केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी ७९० कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. यात ५७६ विविध विभागाचे कर्मचारी, ७० राखीव कर्मचारी व प्रत्येक केंद्रावर एक पोलीस तैनात आहे.
मतदान केंद्रावर कर्मचारी व साहित्य पोहोचविण्यासाठी परिवहन मंडळाच्या १७ एसटी बस, १३ खासगी वाहने व चार शासकीय वाहने होती. ३६३ जागांसाठी ८०४ उमेदवार भाग्य आजमावणार आहेत. तसेच या निवडणुकीत ७६ हजार २१५ एकूण मतदार आहेत. या निवडणुकीसाठी १० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, ते प्रत्येक मतदान केंद्राचा अहवाल सादर करणार आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन तहसीलदार पीयूष चिवंडे यांनी केले आहे.