७६ हजारांची जनावरे चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST2021-04-14T04:12:32+5:302021-04-14T04:12:32+5:30

-------------- घरापुढे ठेवलेली दुचाकी लंपास परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पट्टलवार लाईन येथील मनीष राधेश्याम शर्मा (४८) यांच्या ...

76,000 animals were stolen | ७६ हजारांची जनावरे चोरली

७६ हजारांची जनावरे चोरली

--------------

घरापुढे ठेवलेली दुचाकी लंपास

परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पट्टलवार लाईन येथील मनीष राधेश्याम शर्मा (४८) यांच्या घरापुढे उभी केलेली एमएच २७ बीपी १४०९ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने २८ मार्च रोजी चोरली. याबाबत सोमवारी परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

------------

वडगाव मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक

परतवाडा : ट्रक (एमपी २० पी ५७९६) च्या धडकेत दुचाकी (एमएच २७ बीसी ४४६१) वरील स्वाराला जबर मार लागला. यामध्ये बाबूराव शेवरकर (६०, रा. परसापूर) यांचा मुलगा जखमी झाला. वडगाव फत्तेपूर मार्गावर हा अपघात ९ एप्रिलला घडला. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------

चिखलसावंगी शिवारातून मोटरपंप लंपास

नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील चिखलसावंगी शिवारातील संजय मेंढे (५६, रा. प्रतापनगर, वर्धा) यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने मोटरपंप व केबल असा २० हजारांचे साहित्य लंपास केले. मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------

भांडोली कुरळी शिवारातून साहित्य लंपास

शेंदूरजनाघाट : वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडोली कुरळी शिवारातील संजय कानुगो (५६, रा. वरूड) यांच्या शेतातील खोपडीतून अज्ञात चोरट्याने केबल, सब्बल, कुऱ्हाड असे शेतीपयोगी साहित्य लंपास केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 76,000 animals were stolen