विभागात दोन जिल्ह्यांकरिता पीक विम्याला ७६ कोटी
By Admin | Updated: February 9, 2015 23:05 IST2015-02-09T23:05:09+5:302015-02-09T23:05:09+5:30
विभागातील दोन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या हवामानावर आधारित पीकविम्यापोटी ७६ कोटी ३९ लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. अमरावती व यवतमाळ

विभागात दोन जिल्ह्यांकरिता पीक विम्याला ७६ कोटी
अमरावती : विभागातील दोन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या हवामानावर आधारित पीकविम्यापोटी ७६ कोटी ३९ लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली होती.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारंवार पॅकेजची मलमली करण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीला विमा संरक्षण दिले आहे. त्यानुसार विभागातील आत्महत्याग्रस्त अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात खरीप २०१४ मध्ये हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. प्रायोगिक तत्वावर या दोनच जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या पिकांना योजनेंतर्गत संरक्षण देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून ३७ हजार ९३३ शेतकरी सहभागी होती. त्यांनी ९ कोटी ८ लाख ८७ हजार ६८८ रूपयांचा विमा हप्ता भरला. यवतमाळ जिल्ह्यातील सहभागी शेतकऱ्यांची संख्या विक्रमी होती. यवतमाळ जिल्ह्यातून १ लाख ८६ हजार ६०१ शेतकरी योजनेत सहभागी झाले. त्यांच्याद्वारे भरण्यात आलेल्या विमा हप्त्याची रक्कम ३२ कोटी २४ लाख ३६ हजार २७२ रूपये आहे.
यापूर्वी पिक विमा योजनेविषयी वाईट अनुभव आल्यानंतरही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावरील योजनेत मोठा सहभाग नोंदविला होता. यावर्षीच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस, सोयाबीनसह सर्वच पिकांची उत्पादकता घटली. सोयाबीनच्या उत्पादकतेतही मोठी घट झाली आहे. या नुकसानीची भरपाई विम्यातून होईल, अशी शेतकऱ्यांना होती. (प्रतिनिधी)