जिल्ह्यात ७५ उमेदवारांचे अर्ज दाखल

By Admin | Updated: September 27, 2014 00:54 IST2014-09-27T00:54:34+5:302014-09-27T00:54:34+5:30

जिल्ह्यातील आठही मतदारसंघात आज शुक्रवारी ७५ उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा...

75 candidates filed for the district | जिल्ह्यात ७५ उमेदवारांचे अर्ज दाखल

जिल्ह्यात ७५ उमेदवारांचे अर्ज दाखल

अमरावती : जिल्ह्यातील आठही मतदारसंघात आज शुक्रवारी ७५ उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी सर्वच मतदारसंघांत उमेदवारी अर्जांची उचल आणि दाखल करण्याची धूम दिसून आली. दर्यापूर मतदारसंघातून शुक्रवारी ११ उमेदवारांनी १७ अर्ज तर तिवसा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात शुक्रवारी पाच उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यात बंडू आंबटकर अपक्ष, मनसेतर्फे ज्ञानेश्वर धाने पाटील, बसपातर्फे अभिजित ढेपे, भारतीय बहुजन महासंघातर्फे विनायक तुकाराम दुधे तर भाजपतर्फे राजेश विनायक पाठक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरूवारी काँग्रेसतर्फे वीरेंद्र जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धामणगाव मतदारसंंघात आजपर्यंत एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
मेळघाट मतदारसंघात शुक्रवारी ५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात राष्ट्रवादीचे राजकुमार पटेल, भाजपतर्फे प्रभुदास भिलावेकर, भारतीय जनता पक्षातर्फे रवी रामू पटेल, काँग्रेसतर्फे केवलराम काळे, बसपातर्फे बालकराम जांबेकर यांनी अर्ज दाखल केला. मोर्शी मतदारसंघात शुक्रवारी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते हर्षवर्धन देशमुखांसह एकूण ७ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. शुक्रवारी ११ जणांनी १९ नामांकन अर्ज उचलले. आतापर्यंत ६८ इच्छुकांनी ११६ आवेदनपत्रांची उचल केली. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीतर्फे हर्षवर्धन देशमुख, पक्ष वसंत लुंगे, अपक्ष रोशनी क्षीरसागर आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षातर्फे सुरेंद्र अघम, भाजपतर्फे प्रदीप, महेंद्र बहुजन मुक्ती पक्षातर्फे महेंद्र भातकुले अपक्ष आशिष शामराव वानखडे या ७ उमेदवारांनी आज नामांकन दाखल केले.

Web Title: 75 candidates filed for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.