पोलीस पाटलांची ७४ पदे अद्यापही रिक्त
By Admin | Updated: September 6, 2014 01:27 IST2014-09-06T01:27:28+5:302014-09-06T01:27:28+5:30
शासनाचा शेवटच्या घटकातील महत्वाचा आधार समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील या पदाची तब्बल ७४ पदे रिक्त आहे़...

पोलीस पाटलांची ७४ पदे अद्यापही रिक्त
धामणगाव रेल्वे : शासनाचा शेवटच्या घटकातील महत्वाचा आधार समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील या पदाची तब्बल ७४ पदे रिक्त आहे़ आगामी विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रशासनावर गावाचा भार येणार आहे़ सद्यस्थितीत प्रभारी पोलीस पाटलांना संबधित गावांचा पदभार सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे़
राज्य शासनाच्या महसूल विभागाने दोन तालुके मिळवून एक उपविभाग दहा महिन्यापूर्वी राज्यात तयार केला असला तरी चढाओढीच्या राजकीय स्थितीमुळे चांदूररेल्वे उपविभाग तीन तालुक्यात अस्तित्वात आला आहे़
तिवसा तालुका वगळून नांदगाव खंडेश्वर तालुका चांदूररेल्वे उपविभागाला जोडण्यात आला आहे़ विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजायला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे आगामी काळातील ही निवडणूक पोलीस पाटलाशिवाय या गावातील होणार आहे़
गावातील महत्वाचे व मानाचे तेवढेच जबाबदारीचे पद असलेले पोलीस पाटील याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ आजही गावात दोन कुटुंबात वाद झाल्यास पोलीस पाटलाला बोलावून मध्यस्थी केली जाते़
सर्वसामाण्याचा आधारवड आजही पोलीस पाटील आहे़ महात्मा गांधी गाव तंटा मुक्त अभियानात पोलीस पाटलाची महत्वाची भुमिका आहे़ तब्बल ७४ गावात पोलीस पाटीलच नसल्याने ही गावे या अभियानातून काहीअंशी मागे पडली असल्याचे चित्र आहे़ (तालुका प्रतिनिधी)