जिल्ह्यात रबीची ७३ टक्के पेरणी
By Admin | Updated: December 11, 2015 00:39 IST2015-12-11T00:39:20+5:302015-12-11T00:39:20+5:30
गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात रबीची ७३ टक्के पेरणी
आठवड्यात २० टक्यांनी वाढ : सर्वाधिक ८४ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा
अमरावती : गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. या पैकी १ लाख ८ हजार १६४ हेक्टर क्षेत्रात ९ डिसेंबर पर्यंत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ७३ टक्केवारी आहे.
धारणी तालुक्यात १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १२ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ८८ टक्केवारी आहे. चिखलदरा तालुक्यात ३ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी २ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ९१ .३४ टक्केवारी आहे. अमरावती तालुका ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ३२ टक्केवारी आहे. भातकुली तालुका १८ हजार ४८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ३२ टक्केवारी आहे. नांदगांव तालुका ६ हजार ५५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित पैकी ४ हजार ७२५हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली . ७२.१४ टक्केवारी आहे. चांदुररेल्वे तालुका ५ हजार १०३० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असतांना ५ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. पेरणीची ही ९७ टक्केवारी आहे. वरुड तालुक्यात ६ हजार ९३० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ३ हजार ५३० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. ही ५०.९४ टक्केवारी आहे. दर्यापूर तालुक्यात २५ हजार ६५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १७ हजार ८१९ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. अंजनगांव सुर्जी तालुक्यात १८ हजार ७७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी ५ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. ही ३१ टक्केवारी आहे. अचलपूर तालुक्यात ९ हजार २५० पेरणी पार पडली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ८३ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात हरभरा व २४ हजार ३१ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे.