अचलपूर उपविभागात ७२ रोहित्र निकामी

By Admin | Updated: October 29, 2014 22:41 IST2014-10-29T22:41:56+5:302014-10-29T22:41:56+5:30

वेळेत विजेची देयके आली नाहीत तर वीज खंडित करणारी वीज वितरण कंपनी घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात मात्र अपयशी ठरली आहे. एकट्या अचलपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत

72 Rohitra deficiencies in the Achalpur subdivision | अचलपूर उपविभागात ७२ रोहित्र निकामी

अचलपूर उपविभागात ७२ रोहित्र निकामी

सुरेश सवळे - चांदूरबाजार
वेळेत विजेची देयके आली नाहीत तर वीज खंडित करणारी वीज वितरण कंपनी घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात मात्र अपयशी ठरली आहे. एकट्या अचलपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत तब्बल ७२ रोहित्र निकामी झाले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात हा आकडा १४० वर गेला आहे.
कंत्राटदाराची मनमानी आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे शिरजगाव कसबा परिसरातीील शेतकरी त्रस्त झाले आहेत. यात त्यांचे लाखोंचे नुकसान ङोत आहे. या त्रासाला कंटाळून शिरजगाव कसबा येथील नंदू पेठे या शेतकऱ्याने तर अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याची नोटीस वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना १३ आॅक्टोबर रोजी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनोहर सुने यांनी ‘लोकमत’ला दिली. आ. बच्चू कडून यांनी वीज वितरण कंपनीविरूध्द एल्गार पुकारला असून १ नोव्हेंबरनंतर केव्हाही अचलपूर उपविभागातील कोणतेही विद्युत कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचे रोहित्र निकामी झाल्यानंतर त्याची तक्रार संबंधित कार्यालयात केल्यानंतर एक-एक महिना रोहित्र बदलून देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. तीच अवस्था घरगुती मीटरची आहे. ‘फॉल्टी मीटर’बदलून देण्यासही साहित्याची अडचण दाखवून ही तक्रार प्रलंबित ठेवली जाते. शिरजगाव कसबा विद्युत कार्यालयात तर अनेक महिन्यांपासून कनिष्ठ अभियंत्यांची ५६ पदे रिक्त असल्यामुळे विद्युत ग्राहकांना सेवा मिळत नाही.
नादुरूस्त अवस्थेतील रोहित्र बदलून दिल्यानंतरही त्याचा टिकाऊपणा संशयास्पद असल्याचे बोलले जाते. थूगाव मार्गावरील रोहित्र जून २०१४ मध्ये चोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे रोहित्र बसविण्यात आले खरे. मात्र ते दोन महिन्यातच पुन्हा निकामी झाले.
हीच अवस्था शिरजगाव कसबा पॉवर स्टेशनवरून अंगदपूर फिडरमध्ये होणाऱ्या अनियमित विद्युत पुरवठ्याबाबत आहे. याबााबत शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यांना अनेक निवेदने दिली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनोहर सुने यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: 72 Rohitra deficiencies in the Achalpur subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.