पाणीटंचाई निवारणार्थ ७०० योजना
By Admin | Updated: May 20, 2017 00:49 IST2017-05-20T00:49:15+5:302017-05-20T00:49:15+5:30
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी तयार केलेला पाणीटंचाई

पाणीटंचाई निवारणार्थ ७०० योजना
जूनपर्यंत अंमलबजावणी : टँकरग्रस्त गावांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी तयार केलेला पाणीटंचाई निवारण आराखड्यानुसार काही गावांत संभाव्य पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून ७०० उपयोजना आखण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी वाढविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र २०१७ मध्ये संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर उपाययोजना प्रशासनाकडून आखण्यात आल्या आहेत.पाणीटंचाई निवारणार्थ तयार आराखड्यानुसार आॅक्टोबर २०१६-१७ पर्यंत उपयोजना तयार करण्यात आल्या आहेत. यात विंधन विहिरी व कुपनलिका घेणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, विंधन विहिरींची दुरूती तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा विहीर खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण, बुडक्या घेणे आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे.
अशा आहेत उपयोजना
टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे १५ गावे प्रस्तावित असून ७ गावांत ४ टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विंधन विहिरी व कुपनलिकांसाठी १९२ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी ६४ कामे मंजुर आहेत. नळ योजनांची विशेष दुरूस्ती १४२ कामे प्रस्तावित केलीत, त्यापैकी ९६ कामे मंजूर केली आहेत. खासगी विहिरींचे अधिग्रहणासाठी १७८ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी ७२ कामे मंजूर आहेत. तात्पुरत्या पूरक नळ योजना ४० प्रस्तावित असल्यांमधून १० मंजूर केल्या आहेत. अशा एकूण ७०० योजनांपैकी २४६ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.