३७० दिवसांत कोरोनाचे ७०० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:06+5:302021-04-10T04:13:06+5:30

अमरावती : कोरोनाने ३७० दिवसांत ७०० रुग्णांचा बळी घेतला. त्यामुळे दर दिवशी सरासरी दोन रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यात ४ ...

700 Corona victims in 370 days | ३७० दिवसांत कोरोनाचे ७०० बळी

३७० दिवसांत कोरोनाचे ७०० बळी

अमरावती : कोरोनाने ३७० दिवसांत ७०० रुग्णांचा बळी घेतला. त्यामुळे दर दिवशी सरासरी दोन रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचे आगमन झाले, त्याच दिवशी पहिला बळी ठरला, हे विशेष.

काेरोनाची दुसरी लाट बघता राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केले. दरदिवशी कोरोनाचे रूग्ण आणि मृत्युसंख्या वाढतच आहे. ४ एप्रिल २०२० ते ९ ए्प्रिल २०२१ या दरम्यान जिल्ह्यात कोरोनाने ७०० रुग्णांनी प्राण गमावले. यात ५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक ५१५ जण बळी ठरले आहेत.

यंदा मार्च महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३,५१८ संक्रमित आढळून आले, तर १६४ रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. जिल्हावासीयांसाठी नवीन वर्षातील मार्च महिना कोरोना ‘हॉट’ठरला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १५४ तर, यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक १६४ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. यंदा मार्चपर्यत कोरोनाने ६७४ रुग्ण दगावले आहे. यात ४९६ पुरुष, तर १७८ महिलांचा समावेश आहे.

-------------------

असा वाढला मृत्यूचा आलेख

एप्रिल २०२०- १०

मे- ५

जून- ९

जुलै-४०

ऑगस्ट- ७४

सप्टेंबर- १५४

ऑक्टोबर- ७२

नोव्हेबर- १४

डिसेंबर - १८

जानेवारी २०२१- २२

फेब्रुवारी- ९२

मार्च - १६४

९ एप्रिलपर्यंत- २६

-----------------------

४ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२१ दरम्यान कोरोनाचा दृष्टिक्षेप

एकूण नमुने चाचणी : ३४७८७९

पॉझिटिव्ह रूग्ण : ५१५२५

एकूण मृत्यू : ७००

होमआयसोलेशन : महापालिका १०८५५, ग्रामीण ६७८३

-------------------

कोरोना रुग्णांसाठी खासगी, शासकीय रुग्णालयात बेडचा पुरेसा साठा आहे. कोरोनाने ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी घेतले आहे. त्यामुळे ज्येष्ठांबाबत कुटुंबीयांनी सजग राहावे.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: 700 Corona victims in 370 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.