सखी मंचच्या रक्तदान शिबिरात ७० महिलांचे रक्तदान
By Admin | Updated: October 9, 2015 00:53 IST2015-10-09T00:53:38+5:302015-10-09T00:53:38+5:30
येथील लोकमत सखी मंच, महिला विकास मंच, श्रध्दा शिक्षण संस्था व सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ...

सखी मंचच्या रक्तदान शिबिरात ७० महिलांचे रक्तदान
उत्स्फूर्त प्रतिसाद : ३०० महिलांनी केली रक्तगट तपासणी
वरुड : येथील लोकमत सखी मंच, महिला विकास मंच, श्रध्दा शिक्षण संस्था व सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी वरूड पोलीस ठाण्याच्या सभागृहात बुधवारी रक्तदान शिबिर पार पडले. स्वेच्छा रक्तदान दिवसानिमित्त महिलांनी या शिबिरात स्वयंस्फुर्तीने भाग घेतला. ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये रक्तगट आणि हिमोग्लोबीन तपासणीचा ३०० महिलांनी लाभ घेतला.
रक्तासाठी उद्भवणाऱ्या समस्यांची ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी दखल घेऊन ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाची स्थापना १ जानेवारी २०१५ ला केली. याअंतर्गत त्यांनी नऊ महिन्यांत तब्बल ५९ रक्तदान शिबिरे घेऊन ३ हजार ७०० रक्तपिशव्या संकलित केल्यात. संघाच्या या कार्याची दखल अनेक सेवाभावी संस्थांनी घेतली. महिला विकासमंच, लोकमत सखीमंच, श्रध्दा शिक्षण संस्था, सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेनेसुध्दा रक्तदान चळवळीची दखल घेतली. याअंतर्गत बुधवारी स्थानिक पोलीस ठाण्याच्या सभागृहात सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेऊन ७० रक्त पिशाव्या संकलित केल्यात. यामध्ये ८० टक्के महिलांनी रक्तदान केले. ३०० महिलांनी रक्तगट तसेच हिमोग्लोबीन तपासणी करवून घेतली.
महिलांच्या रक्तदान शिबिरामध्ये बंदोबस्ताकरिता आलेल्या पृथ्वीराज राठोड आणि संजय राठोड या पोलिसांनीसुध्दा स्वेच्छेने रक्तदान केलेत. शिबिराकरिता नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढीची चमू प्रवीण पाटील, आरोग्य कर्मचारी कल्पना वानखडे, दिव्या पौनिकर, कोमल सुतार, अनूप बिलोरकर तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा रक्तदाता संघाचे कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार यांच्यासह वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. शिबिराकरिता लोकमत सखीमंच विभागप्रमुख रचना सोनारे, संयोगिता खासबागे, ममता भंडारी, वंदना बारस्कर, शारदा निचत, पूजा ठाकरे, अश्विनी शेंदरे, उषा ठाकरे, महिला विकासमंचच्या अध्यक्षा माया यावलकर, जया नेरकर, प्रणिता लेकुरवाळे, चंद्रलेखा केवटे, अल्का मांडवगडे, वैशाली शिंगरवाडे, आरती मांडवगडे, प्रांजली कुऱ्हाडे, दिप्ती दुर्गे, मीना बंदे, सरिता खेरडे, निशिगंधा खासबागे, आशा खासबागे, श्रध्दा शिक्षण संस्था, सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था आदींच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. केवळ महिलांकरिताच पार पडलेले हे पहिलेच रक्तदान शिबिर होय. या शिबिरात तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. (तालुका प्रतिनिधी)