महापालिका प्रशासनात ६० दिवसांत ७० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:21+5:302021-03-04T04:21:21+5:30

(लोगो) अमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा थेट फटका प्रशासनालाही बसला आहे. जानेवारी व ...

70 positives in 60 days in municipal administration | महापालिका प्रशासनात ६० दिवसांत ७० पॉझिटिव्ह

महापालिका प्रशासनात ६० दिवसांत ७० पॉझिटिव्ह

(लोगो)

अमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा थेट फटका प्रशासनालाही बसला आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तब्बल ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येते. अपुऱ्या मनुष्यबळावर कोरोना संकटाचा सामना करताना आयुक्तांची कसरत होत आहे.

महापालिकेतील बहुतेक कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो व अलीकडे प्रतिबंधक उपाययोजनांचा बोजवारा उडाल्याचे सर्वत्र दिसून येते. यांसह अभ्यागतांचे ऑक्सिमीटर व थर्मल स्क्रीनिंग हा प्रकारच आता बंद झालेला आहे. कर्मचाऱ्यांद्वारे त्रिसूत्रीचा वापर कमी झाल्यानेही फटका बसला आहे.

केवळ आरोग्य विभागाच्या भरवशावर कोरोना संसर्गाशी लढा देणे शक्य नसल्याने आयुक्तांनी आता अन्य विभागांचे व अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग या कामी घेतला आहे. सातत्याने वर्षभरापासून आयुक्तांसह आरोग्य यंत्रणा या कामी लागलेली आहे. स्वत: आयुक्त संक्रमणातून मुक्त झाल्यानंतर नव्या जोमाने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले आहे.

दोन महिन्यांत सर्वच झोनसह संगणक, विधी, बांधकाम, कार्यकारी अभियंता-१, अग्निशमन, नगर सचिव, स्वच्छता, पशुवैद्यकीय, शिक्षण, विद्युत, एनयूएलएम, सार्वजनिक आरोग्य या विभागांतील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.

बॉक्स

हे अधिकारी बाधित

महापालिकेतील झोन क्र १,२ व ३ चे सहायक आयुक्त, शहर अभियंता, सिस्टीम मॅनेजर, विधी अधिकारी, उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी डॉक्टर, लिपिक आदींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यांसह २० कंत्राटी कर्मचारीदेखील या काळात संक्रमित झाले आहेत.

कोट

०००००००००

०००००००००००००

प्रशांत रोेडे

आयुक्त, महापालिका.

Web Title: 70 positives in 60 days in municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.