नगर पंचायतीकडून ७० घरांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:57+5:302021-02-05T05:23:57+5:30
नांदगाव खंडेश्वर : नगर पंचायतीच्या क्षेत्रात असणाऱ्या २५८ पारधी कुटुंबांच्या घरांपैकी ७० घरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच इतर ...

नगर पंचायतीकडून ७० घरांचा प्रस्ताव
नांदगाव खंडेश्वर : नगर पंचायतीच्या क्षेत्रात असणाऱ्या २५८ पारधी कुटुंबांच्या घरांपैकी ७० घरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच इतर घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना व वस्ती सुधार योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतींचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी नगर पंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केली.
शुक्रवारी येथील विश्रामगृहात राज्यमंत्री कडू यांनी नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीचा आढावा घेतला. पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्रधिकरणाकडे पाठपुरावा करावा. तसेच चौदाव्या वित्त योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा. वस्ती सुधार योजनेतून रस्ते, नाल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. घरकुल पूर्ण करण्यासाठी रेतीचा प्रश्न येत आहे. यासाठी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी अर्ज केल्यास त्याला पास देण्याची सुविधा दिली जाईल. गेल्या तीन वर्षांपासून अपंग कल्याणचा निधी वितरित करण्यात आलेला नाही, हा निधी लवकरच वितरित करण्यात येईल. स्मशानभूमीमध्ये विजेची सुविधा नसल्याने याठिकाणी तातडीने वीज पुरवठा करण्यात येईल, असेही कडू यांनी बैठकीत सांगितले.