७० तास गायनाचा करणार वर्ल्ड रेकॉर्ड !
By Admin | Updated: September 22, 2016 00:21 IST2016-09-22T00:21:54+5:302016-09-22T00:21:54+5:30
शहरातील प्रसिद्ध गायक बाबलेश उर्फ बाबा गडलिंग सलग ७० तास गीतगायन करुन गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड करणार असून...

७० तास गायनाचा करणार वर्ल्ड रेकॉर्ड !
बाबलेश गडलिंग : गिनीज बुक घेणार नोंद
वरूड : शहरातील प्रसिद्ध गायक बाबलेश उर्फ बाबा गडलिंग सलग ७० तास गीतगायन करुन गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड करणार असून याकरीता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरिता नामांकन झाले असून १५ आक्टोबरला स्थानिक काठीवाले सभागृहात शेकडो चित्रपट गीत गाण्याचा विक्रम करणार आहे. हा उपक्रम ३ दिवस आणि ३ रात्र चालणार असून विशेष म्हणजे युगलगीते गायीली जाणार आहेत. वरुडच्या इतिहासाात पहिल्यांदा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डकरीता सदर युवा गायक पुढे आल्याने अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
अत्यंत कठोर परिश्रम आणि सरावातून मेहनतीने सुमधूर गीते गावून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विदर्भात अनेक ठिकाणी आॅर्केस्ट्राच्या माध्यमातून विदर्भात प्रसिद्ध गायक बबलेश उर्फ बाबा गडलिंग यांनी गायक म्हणून स्वत:ची छाप पाडली. आपणही गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड करावा, म्हणून वर्ल्ड रेकॉर्डकरीता नमाांकन केले आणि परवानगी मिळाली. वर्ल्ड रेकॉर्ड करण्याकरीता सलग ७० तास गीत गायन करावे लागणार आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्याचा दुष्टीकोनातून बबलेश गडलींग यांनी तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नागपूर येथील युथ वेल्फेअर संस्थेचे मनीष पाटील हे नुकतेच वरूडमध्ये येऊन गेले आणि ज्याठिकाणी हा रेकॉर्ड निर्माण केल्या जाणार त्या काठीवाले सभागृह आणि इतर बाबींची त्यांनी पाहणी करून येत्या १५ आॅक्टोंबरला कोणत्याही प्रकारचा खंड न पडता ३ दिवस आणि ३ रात्री हा गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)