बाजार समितीला ७ कोटी २१ लाखांचे उत्पन्न
By Admin | Updated: May 23, 2014 23:33 IST2014-05-23T23:33:33+5:302014-05-23T23:33:33+5:30
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला फुलबाजार, धान्यबाजार व भाजीबाजारातून २०१३-१४ या आर्थिक वर्षात ७ कोटी २१ लाख ८४ हजारांचा बाजार सेस मिळाला आहे.

बाजार समितीला ७ कोटी २१ लाखांचे उत्पन्न
अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला फुलबाजार, धान्यबाजार व भाजीबाजारातून २०१३-१४ या आर्थिक वर्षात ७ कोटी २१ लाख ८४ हजारांचा बाजार सेस मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेता आजवरचे हे सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना २७ आॅक्टोबर १९५७ मध्ये करण्यात आली. धान्य व कॉटन मार्केटचे एकत्रिकरण २० एप्रिल १९७१ मध्ये करण्यात आले. बाजार समितीच्या ५७ वर्षांच्या इतिहासात यंदा बाजार समितीला प्रथमच विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. शेतीमालाच्या विपणन व्यवस्थेत असलेले दोष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बाजार समितीने प्रयत्न केले. त्याचा सापेक्ष परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नवाढीवर झाला आहे. अमरावती बाजार समितीचा गेल्या पाच वर्षांचा आढावा घेता सन २००९-१० मध्ये २ कोटी ३१ लाख, २०१०-११ मध्ये १ कोटी ५१ लाख, २०११-१२ मध्ये ४ कोटी ७८ लाख, २०१२-१३ मध्ये ५ कोटी ३० लाख व २०१३-१४ मध्ये ७ कोटी २१ लाख इतके उत्पन्न मिळाले चालू आर्थिक वर्षात ३ लाख ५८ हजार रूपयांचे उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले आहे.