पीएम स्वनिधीसाठी महानगरातून ६९०२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:51+5:302021-02-05T05:29:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी फेरीवाल्यांनाआर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने पीएम स्वनिधी योजना सुरू आहे. याअंतर्गत लाभार्थ्याला कर्ज ...

6902 applications from PM for PM Swanidhi | पीएम स्वनिधीसाठी महानगरातून ६९०२ अर्ज

पीएम स्वनिधीसाठी महानगरातून ६९०२ अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी फेरीवाल्यांनाआर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने पीएम स्वनिधी योजना सुरू आहे. याअंतर्गत लाभार्थ्याला कर्ज स्वरुपात १० हजारांची मदत दिली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात ७ हजार ७७० जणांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असताना ६९०२ अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. त्यापैकी १८३० अर्ज त्रुटीसदृश आढळल्याने नामुंजूर करण्यात आले, उर्वरित ५०७२ अर्जांपैकी १८२९ अर्ज विविध बँकांनी मंजूर केले आहेत. त्यातील १११८ लाभार्थ्यांना कर्जस्वरुपात १० हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या एनयूएलएम विभागाचे व्यवस्थापक प्रफुल्ल ठाकरे यांनी दिली.

महापालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान राबवून फेरीवाल्याच्या विविध सात संघटनांद्वारा जनजागृती तसेच १२ कर्मचाऱ्यांद्वारा सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ३४३२ फेरीवाले निष्पन्न झाले. योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांना महापालिकेत अर्ज सादर करावा लागतो.

बॉक्स

३४३२ जणांच्या बँक खात्यात पेनीड्रॉपद्वारे १ रुपया

बँकांनी फेरीवाल्यांना कर्ज मंजूर केल्यानंतर त्यांना पेटीएमद्वारा पैसे प्राप्त झाल्यास कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे महापालिकेद्वारा शहरातील ३४३२ लाभार्थींच्या बँक खात्यात प्रत्येकी १ रुपया टाकून शहानिशा करण्यात आली. त्यानंतर बँकेतून १११८ लाभार्थिंच्या खात्यात कर्जस्वरुपातील रक्कम जमा झाल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

कोट

कर्मचाऱ्यांद्वारा शहरात सर्वे करून ३४३२ फेरीवान्याची निवड केली. त्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले. ऑनलाईन अर्ज बँकांनासुद्धा प्राप्त झाला. मात्र, काही राष्ट्रीयीकृत बँकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

- प्रफुल्ल ठाकरे,

व्यवस्थापक, राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान, महापालिका

Web Title: 6902 applications from PM for PM Swanidhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.